Yuga Part 1

Varunraj kalse
Yuga Part 1
भारतीय संस्कृतीच्या इतिहासात आपण चार युगांचा उल्लेख ऐकलं आहे आणि वाचला आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग.
पण हे युग म्हणजे काय आहे?
असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो का?
आज बघू कि हे युग काय आहे?
कसे बनते?
किती काळ म्हणजे एक युग म्हणले जाऊ शकते?
आपल्याला साधारण पणे युगे २८ असे विठ्ठल देवांच्या आरतीत असलेला उल्लेख सर्वश्रुत आहे.
वेळेनुसार बदलणाऱ्या मानव आदी प्राण्यांच्या अवस्था, विशिष्ट कालखंड, कालपरिमाण इ. दर्शविण्यासाठी जगातील विविध संस्कृतींमध्ये वापरली जाणारी कालगणनेच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे युग होय.
भारतात युग ही संज्ञा घटनांच्या काळाचा बोध करून देण्यासाठी वापरली जात असली, तरी या बाबतीत ती फारशी उपयुक्त ठरत नाही.
कारण, पौराणिक कथा आणि ऐतिहासिक वारसा अशा दोन्ही प्रकारच्या घटनांचे वर्णन करताना युग ही एकच संज्ञा वापरण्यात आली आहे. युग या संज्ञेने नेमका किती वर्षांचा कालावधी सूचित होतो, याविषयी अनिश्चितता आहे.
काळाच्या ओघात या संज्ञेचा अर्थ बदलत गेला आहे तसेच, पुराणांच्या अतिशयोक्ती करण्याच्या प्रवृत्तीमुळेही अर्थबोधात अडचण निर्माण झाली आहे. तथापि, के. ल. दप्तरींसारख्या संशोधकांनी आपल्या संशोधनाद्वारे वरील अडचणींवर मात करून या क्षेत्रात बरीच सुसंगती आणली आहे
हिंदू पुराणकथांनी कालक्रम दर्शविण्यासाठी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशी चार युगे मानली आहेत. कलियुगातनंतर पुन्हा नव्याने कृतादी युगांचा क्रम सुरू होतो.
ही चक्राकार कालगती अनादिकाळापासून चालत आली असून अनंतकाळपर्यंत चालणार आहे. दिवस-रात्र, चंद्राचा क्षय व वृद्धी, ऋतुचक्र, वर्तमाना विषयीचे वैफल्य व भविष्या विषयीचा आशावाद इत्यादींच्या प्रभावातून चक्राकार कालगतीची संकल्पना निर्माण झाली असे दिसते.
सरळरेषेतील कालगती न स्वीकारता चक्राकार कालगतीची संकल्पना स्वीकारणे, हे कालविषयक भारतीय (व ग्रीक) पुराणाकथांचे एक खास वैशिष्ट्य होय.
प्रत्येक युगाच्या मुख्य कालखंडापूर्वी संध्या आणि नंतर संध्येइतकाच संध्यांश असे कालखंड असतात. संध्येचा कालखंड मुख्य कालखंडाच्या एकदशांश इतका असतो.
कलियुगाचा मुख्य कालखंड १,००० दिव्य वर्षांचा म्हणजेच एकूण कालखंड १,२०० दिव्य वर्षांचा असतो. द्वापर, त्रेता व कृत यांचा कालखंड कलियुगाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट व चौपट असतो.
त्या तीन शब्दांचे अर्थ अनुक्रमे दोन, तीन व चार (कृत = चार) या संख्येशी निगडित आहेत, यावरूनही हे स्पष्ट होते. युगांच्या नावांचा द्यूतातील फाशांशी असलेला संबंधही हेच दर्शवितो.
या फाशाच्या चार बाजूंपैकी एकीवर एक, दुसरीवर दोन, तिसरीवर तीन व चौथीवर चार ठिपके असतात आणि त्यांना अनुक्रमे कली, द्वापर, त्रेता व कृत अशी नावे असतात.
कृतादी चार युगांचे मिळून एक महायुग बनते. त्याचा कालावधी १२ हजार दिव्य वर्षे होतो. एक दिव्य वर्ष म्हणजे मानवाची ३६० वर्षे असल्यामुळे तो कालावधी ४३ लक्ष २० हजार मानवी वर्ष इतका होतो.
चार युगांचा कालावधी समान नसतो परंतु सर्व महायुगांचा कालावधी मात्र समान असतो. त्यामुळे युग हा मुख्यत्वे विशिष्ट कालखंड दर्शविणारा, तर महायुग हा कालपरिमाण दर्शविणारा शब्द ठरतो.
आर्यभट्टाने मात्र सर्व युगांचा कालावधी समान मानला आहे. एक हजार महायुगांनी बनणाऱ्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसास कल्प असे म्हणतात. या कल्पाची विभागणी १४ मन्वंतरांमध्ये करण्यात आली आहे.
सध्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा द्वितीय परार्ध (बहुधा एक्कावनावे वर्ष) त्या वर्षाच्या कोणत्या तरी महिन्यातील श्वेतवाराह नावाचा बहुधा सव्वीसावा कल्प, वैवस्वत नावाचे सातवे मन्वंतर आणि त्यातील अठ्ठाविसावे कलियुग चालू आहे.
या कलियुगाचा प्रारंभ महाभारताचे युद्ध, कृष्णाचे निजधामास जाणे, परीक्षिताचा जन्म वा राज्यारोहण इ. प्रसंगांशी जोडला जातो. हे युग इ. स. पू. ३१०२ मध्ये १७ व १८ फेब्रुवारी या दिवसांना जोडणाऱ्या मध्यरात्री सुरू झाले, असे मानले जाते.
विष्णूचा ⇨कल्की अवतार संपेल, तेव्हा हे युग संपून नवे कृतयुग सुरू होईल.
क्रमश :
टीप – वरील सर्व माहिती हि विविध ग्रंथ आणि पुस्तके ह्यांच्या अभ्यासाअंती आपल्या समोर मांडली आहे.
यशश्री जोशी (ताई) व्हाट्सअँप संपर्क ७२४९०७३९५८
आयुर्वेदाच्या मर्यादा…!(Opens in a new browser tab)
Shree Yantra(Opens in a new browser tab)
One Comment
I would like to thank you for the efforts youve put in writing this blog. Im hoping to view the same high-grade content by you later on as well. In fact, your creative writing abilities has encouraged me to get my own, personal blog now ;)