My title My title
Something Different

Agni 5 cha Dhamaka

अग्नी ५ चा धमाका…! 



२७ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या अग्नि-५ (Agni 5) या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनं भारताची वैज्ञानिक क्षमता आणि संरक्षण सिध्दता या दोन्ही क्षेत्रांतील आत्मनिर्भरतेचं दर्शन घडवलं.



या क्षेपणास्त्राच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगताहेत डॉ.काशिनाथ देवधर.



स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख दुसरा :


संपुर्ण स्वदेशी तंत्राने बनलेल्या अग्नि-५ (Agni 5)  च्या मागीलवर्षी पार पडलेल्या उपभोक्ता चाचणीमध्ये लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने त्याच्या स्थापनेनंतर १७ वर्षांनी केलेली पहिलीच आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी.

रात्रीच्या वेळी अचूकतेनं पार पडलेली चाचणी अशी दोन वैशिष्ट्यं आहेत.

१५०० किलो वजनाचे युध्दशीर्ष घेऊन ध्वनीच्या २४ पट गतीनंहे क्षेपणास्त्र त्याच्या निर्धारित लक्ष्यावर आदळलं.

५००० ते ८००० किलोमीटरच्या टप्प्यातील लक्ष्यावर अचूकपणे मारा करण्याची भारताची क्षमता शास्त्रज्ञांनी सिध्द केली.

आय.जी.एम.डी.पी. – इंटीग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेन्ट प्रोग्राम (The Integrated Guided Missile Development Program).

१९९० मध्ये सुरू झालेल्या कार्यक्रमा अंतर्गत जमिनीवरून डागली जाणारी आणि जमिनीवरील लक्ष्य भेदणारी ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्रे.

जमीनीवरून हवेतील लक्ष्य भेदणारे ‘आकाश’ क्षेपणास्त्र, कमीतकमी वेळात लक्ष्यभेद करणारे ‘त्रिशूल’ आणि रणगाडाभेदी ‘नाग’ आदी क्षेपणास्त्रांचा विकास केला गेला.

सध्या या क्षेपणास्त्रांच्या विकसीत आवृत्त्या संरक्षण दलांत तैनात आहेत. या गटांतले पाचवे क्षेपणास्त्र म्हणजे ‘अग्नि’. ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र १०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यभेद करणारे होते.

तर ‘अग्नि’ हे किमान एक हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदणारे आहे. या श्रेणीतील अग्नि १ एक हजार, अग्नि २ दोन हजार तर अग्नि ३ पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्यभेद करू शकते.

त्यांची निर्मिती करताना अनेक प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली विकसीत केल्या गेल्या.

प्रचंड ताण आणि भार सहन करू शकणारा क्षेपणास्त्र सांगाडा आणि त्यावर जोडल्या जाणाऱ्या प्रणोदन, निर्देशन, नियंत्रण आणि युध्दशीर्ष आदी वेगेवेगळ्या प्रणाली, त्याच्या प्रक्षेपणाची यंत्रणा.

प्रक्षेपणानंतर त्याला आवश्यक असणारी रडार यंत्रणा आणि स्वतंत्र क्षेपणास्त्र संगणकीय प्रणाली आणि विविध प्रकारचे सेन्सर्स या साऱ्याचा विकास भारतीय शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे केलेला आहे.


हा या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातला मोठा विशेष आहे. अग्नि-५ (Agni 5) चा माऱ्याचा टप्पा खूप लांबचा असल्यानं त्याची इंधन प्रणोदन प्रणाली तीन टप्प्यांची बनलेली आहे.

या क्षेपणास्त्राची लांबी १७.५ मीटर, व्यास २ मीटर, वजन ५० टन तर किंमत ५० कोटी रुपये असते. ५५०० ते ८००० किलोमीटर दूरवरील लक्ष्यभेद करताना जास्तीत जास्त ४० मिलीमीटरची चूक होईल एवढी अचूकता या क्षेपणास्त्र प्रणालीत आहे.


एवढे प्रचंड अंतर कापण्यासाठी हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणाच्या थरांबाहेर जाते आणि लक्ष्याच्या दिशेने पुन्हा वातावरणात प्रवेश करते. त्यावेळी त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या २४ पट इतका प्रचंड असतो.

वातावरणात प्रवेश करताना होणाऱ्या घर्षणामुळे युध्दशीर्षावरील आवरण ३००० अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापते. एवढ्या तापमानात ते जळून जाऊ नये यासाठी ते खास उष्णतारोधी कार्बन कंपोझिटचे बनलेले असते.

हायपरसोनिक (आवाजाच्या वेगाच्या सहासात पट गतीने मारा करणारी) क्षेपणास्त्रं आणि एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांचा भेद करणारी एसआयआरव्ही प्रकारातील क्षेपणास्त्रं.

हे या आयजीएमडीपी कार्यक्रमाचे पुढचे टप्पे असून त्यांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यांच्या विकासातून ‘समर्थ भारत सशक्त भारत’ ही घोषणा सार्थक करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.


लेखक हे संरक्षण संशोधन व विकास संस्थेतील (DRDO) चे वरिष्ठ निवृत्त शास्त्रज्ञ आहेत.



स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख दुसरा…



Disclaimer:

This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button