Mental Health
एक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…

एक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…
©सौ. वैष्णवी व कळसे
नातं खरं असेल तिथे विचार करून बोलायची गरजच नसते. जिथे काय बोलायचं आहे आणि किती बोलायचं आहे हे ठरवावं लागत असेल तर नक्कीच ते नातं कच्चं आहे समजावं…..
खरंतर कच्चं म्हणणे चुकीचेच आहे कारण नातं कच्चं पक्क, कमी जास्त, लहान मोठं हे बघायचंच नसतं……
हा आपण असं म्हणू शकतो की हे नातं परिपक्व झालेलं नाही अजून… !
आपल्याच माणसाशी बोलताना कुठला संकोच वाटत असेल, भीती वाटत असेल किंवा काही गोष्टी इथे न बोललेल्याच बऱ्या असं वाटत असेल तर नक्कीच तिथे विश्वासाची कमी आहे…. याचा शोध घेतला पाहिजे…..
कदाचित….. होऊ शकतं की विश्वासाने आपण काही सांगितले असेल आणि त्यांनी ते आणखी कोणाला सांगितले असेल! यात सांगणे, लपवणे याचा विषय नाही;
पण स्वतःनंतर आपण तो विश्वास कोणावर ठेवला असेल तर तिथे आपण disappointed होतो……
तसा तर फार अनुभव नाही मला; पण एक गोष्ट आयुष्याने शिकवली, ती म्हणजे प्रत्येक नात्यात एक अंतर असतं व ते असलं पण पाहिजे…. निश्तितच ते नातं जास्त टिकवायचं असेल तर….
कधीकधी आपल्याला वाटतं की आपल्या माणसाला आपण पूर्णपणे ओळखतो; पण तसं नसतं……
प्रत्येकाला आपली privacy दिलीच पाहिजे..
आपल्या माणसाने आपल्याशीच बोलावं, आपल्यासोबतच प्रत्येक आनंद मानावा, किंवा आपल्याशी हसत खेळत बोलतोय म्हणजे काहीच कमी नाही अशी समज असणं चुकीचं आहे……
स्वतःचा असा वेगळा वेळ दिलाच पाहिजे, सतत आपण सोबत आहोत यातच आनंद मानावा अशा निरर्थक अपेक्षा ठेवणं चुकीचंच…..
खऱ्या नात्यांमध्ये लावून दिलेली चौकट नसते, किंवा कुठला timetable नसतो, की या या वेळे प्रमाणे वागले पाहिजे हे केले पाहिजे…. असं राहावं, वागावं….
असा विचार केला तर आपल्याच माणसाचे अस्तित्व काढून घेतल्यासारखे होईल……
आपली आवड तिच समोरच्याची आवड, असं तर नाही होऊ शकत ना? आवड एक नाही म्हणून नातं खोटं का?
नात्यात adjustment जरीही असली तरी तिथे compulsion नसावं…..
सर्वाना स्वतःची आवड जपावी वाटते व जपलीही पाहिजे… नाहीतर वाटतं की हे नातं प्रेमाने नाही फक्त formality ने बांधून आहे… जे फार काळ टिकू शकणार नाही…
आपापली कामं आपापल्या पद्धतीने करू द्यावीत…. उगीच हे असं नको करू तसं कर वगैरे म्हणत आपलीच पद्धत लागू करू नये…. एकमेकांच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्यापेक्षा पूर्ण पणे स्वातंत्र्य द्यायला हवं….
हक्काचं नातं आहे म्हणून समोरच्यासाठी कुठला निर्णय स्वतःच घेणे, यात काही चुकीचे नाही;पण अशावेळेस समोरच्याला गृहीत धरल्यासारखं वाटू शकतं….
भल्यासाठी जरीही असेल तरीही त्याचं मत न घेता आपला निर्णय लादणे चुकीचेच…..
शेवटी आपण suggest करू शकतो decide नाही…
“नात्यामध्ये सर्व ठरवण्याची authority मलाच आहे, कारण मला चांगलं वाईट कळतं, मी मोठा आहे.”
हा विचार कितपत योग्य आहे? नातं म्हणून निर्णयाचा मान जरी ठेवण्यात आला तरीही त्या व्यक्तीच्या मनातून आपण दूर करतोय स्वतःला हे समजायला हवं…..
आज आपल्याकडे अधिकार आहे, power आहे म्हणून हवं तसं वागून घ्यायचं; पण कायम त्या power चा उपयोग करून स्वतःला लहान दाखवण्यापेक्षा न वापरता मोठं बनावं….
नाहीतर जेव्हा समोरच्याची वेळ येते तेव्हा revenge मध्ये घेण्यात येत….
जो व्यक्ती जसा आहे तसाच स्वीकारायला हवं, त्याला पूर्णपणे बदलवून काय उपयोग? ज्याला स्वतःची आवड नाही, स्वतःच मत मांडायची मुभा नाही, स्वतःची इच्छा नाही, म्हणजेच स्वतःच अस्तित्वच नाही… असं जिवंत प्रेत सोबत घेऊन फिरण्यात कसला आलाय मोठेपणा?
बघायला गेलं तर स्वतःचा एक हट्ट सुद्धा कोणासाठी आपण सोडत नाही, एक सवय कोणासाठी बदलवू शकत नाही…. मग ही अपेक्षा करतोय कशी आपण?
नात्यामध्ये conditions आणि instructions का असाव्या?
आनंद, स्वातंत्र्य, निसंकोचपणा, काळजी, म्हणजेच खरं नातं…. !
आपलं मत काय आहे?