Brain StormingSomething Different
Reiki Series Part 1 & Part 2 in Marathi
Reiki अभ्यास भाग-१
©दयानंद गुरूजी, संपर्क-8652170720
‘की’ — जीवन स्त्रोत…
Reiki मधील ‘की’ म्हणजे चीनीमधील चीसारखाच आहे. संस्कृतमध्ये त्याला प्राण म्हणतात. हवाईतील Reiki शिक्षक त्याला ती किंवा की नावाने जाणतात.
त्याला ‘ओडिस फोर्स, ऑर्गन किंवा बायोप्लास्मा’ ही म्हटले जाते. प्राणाला विविध अनेक संस्कृतींनी अनेकानेक विविध नावे दिली आहेत. पण ते तत्त्व मात्र एकच आहे.
‘की’ म्हणजे जीवन स्त्रोत. त्याला जीवनातील खरा सत्याचा स्त्रोत किंवा वैश्विक जीवनाचा स्त्रोतही म्हटले जाते. ती अशारीरिक शाक्ति आहे. ती सर्वामध्ये असते.
जोपर्यंत कुठली गोष्ट जीवंत असते तोपर्यंत तीत या शक्तीचा वास असतो. ती गोष्ट मृत होते म्हणजे तिच्यातील ती शक्ती बाहेर पडली असते.
हा जीवनस्त्रोत तुमच्यात कमी प्रमाणात असेल किंवा तो पूर्णपणे तुमच्यात येण्यास अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही आजारी असता किंवा अतिसामान्य, नगण्य असता.
जेव्हा हा स्त्रोत आपल्यात अडथळ्याशिवाय, जोरात, मोकळेपणे असतो तेव्हा आपण आजारी पडण्याची शक्यता कमी असते.
आपण जी प्रत्येक गोष्ट करीत असतो त्यात जीवनस्त्रोत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावित असतो. तो आपल्या शरीरात चैतन्य भरतो.
आपल्या भावानांची प्राथमिक शक्ती या स्त्रोताद्वारेच येते. आपल्या विचारांमध्ये आणि आध्यात्मिक जीवनातही त्याचा वाटा असतो.
चिनी लोक या जीवनस्त्रोताला अत्यंत महत्त्व देतात. ते ह्या जीवन स्त्रोताला ‘ची’ म्हणतात. त्यांनी ‘ची’ बाबत प्रचंड अभ्यास केलाय.
हजारो वर्षांपासून ते त्याबाबत संशोधन करुन त्याचा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या संशोधनातून अनेक प्रकारचे ची असल्याचे त्यांना आढळून आले आहे.
आंतरिक औषधाचे पिवळे श्रेष्ठ, सार्वभौम राजे’ की जे ४००० वर्षापूर्वीचे आहेत ते बत्तीस विविध प्रकारच्या ‘ची’ किंवा ‘की’ ची यादी देतात.
युद्धकला शिकणारे शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी ‘की’ चा उपयोग करतात. प्राणायामासारख्या चित्तैकाग्र करण्याच्या साधनेतही त्याचा वापर होतो.
सर्वच विविध संस्कृतीमधील पारलौकिकतेच्या गोष्टी त्याच्याशी संबंधितच असतात. आध्यात्मिक जागृतीसाठी ही त्याचे अनन्यासाधारण महत्त्व आहे.
आपल्या भावनांच्या प्रकटीकरणासाठी त्याची आवश्यकता असते. सर्व कमींना भरुन काढण्याच्या पद्धतीतही की आहेच. ही अशारीरिक अद् भूत शक्ती आहे.
सर्वकमींना भरुन काढण्यासाठी ती आवश्यक आहे. ‘की’ म्हणजे आपले वर्तमान अस्तित्व. ‘की’ चे अस्तित्व आपल्या सभोवती आहे.
साक्षात चैतन्याच्या मार्गदर्शनाने चालणारा जीवन स्त्रोत.
साक्षात चैतन्य म्हणजे ‘रे’ आणि त्याच्या मार्गदर्शनाने चालणारा जीवन स्त्रोत किंवा जीवनातील खरी शक्ती म्हणजे ‘की’ त्याला आपण Reiki म्हणतो.