My title My title
Post'sSomething Different

Useful Telegram Bots

Useful Telegram Bots



©वरुणराज कळसे



सोशल मीडियाच्या या जमान्यात तुम्हाला अनेक Apps मध्ये आलेले नवे नवे फीचर्स आत्मसात करावे लागतात.

नवीन समाजमाध्यमांमध्ये सतत येणारे अपडेट्स तुम्हाला लक्षपूर्वक शिकावे लागतात. यामुळे त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनात होतो.

अनेकजणं फेसबुकशी Instagramशी सरावले आहेत मात्र अजूनही अनेकांना उपयोगी अश्या Telegram ची सवय अजून झालेली नाही.

Telegram वर असे काही भन्नाट फीचर्स (बॉट्स bots) आहेत जे वापरून तुम्ही तुमच्या मोबाईल मधील अनेक Apps ना कायमचा राम राम करू शकता.

जाणून घेऊयात आज या 10 Telegram बॉट्स (bots) विषयी

१. True caller Bot (@RespawnRobot)

हा बॉट True caller कंपनीने स्वत: बनवलेला आहे. हा बॉट जर तुमच्या Telegram मध्ये असेल तर तुम्ही मोबाईल मधील True Caller App ला कायमचा राम राम करून टाका.

कारण जे काम हे application जे काम तेच काम हा बॉट करतो. म्हणजेच कोणत्याही मोबाईल नंबर चे डीटेल्स शोधणे.

तुम्हाला फक्त Telegram app मध्ये जाऊन True Caller Bot अस सर्च करायचं आहे. त्यात जाऊन Start ला क्लिक करा आणि नंतर login करा तुमचा bot तुम्हाला हव्या त्या नंबर ची डीटेल्स शोधून देईल. 

True Caller App मोबाईल मधुन काढून टाकल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये 209 MB स्पेस रिकामी होईल.  सोबतच 64MB Ram सुद्धा फ्री होईल. तसेच दिवस भर हे App तुमच्या मोबाईलच्या इंटरनेट data मधील 20-30 MB data वापरते तो सुद्धा वाचेल. आणि २० मिनिटे बॅटरी जास्त चालेल.

 

२. User Name Bot (@username_bot)

आजकाल अनेक वेबसाईट अश्या असतात की तिथे तुम्हाला युजर नेम वापराव लागत. आणि जर तुमच्या आधी ते कोणी घेतले असेल तर ते युजर नेम तुम्हाला मिळत नाही. 

पण तुम्ही सगळ्याच वेबसाईटवर तेच युजरनेम वापरत असाल आणि एखाद्या वेबसाईटवर तुम्हाला मिळत नसेल तेव्हा हा Bot कामाला येतो.

तुम्हाला फक्त इतर दोन वेबसाईट वर असलेले तेच युजर नेम दाखवल्यावर हा Bot तुम्हाला सांगितलेल्या वेबसाईटवर ते युजरनेम मिळवून द्यायला मदत करेल.

 

३. Translator Bot (@YTranslateBot )

हा bot तुम्ही टाईप केलेल्या कोणत्याही शब्दाला किंवा वाक्याला ट्रान्सलेट करून देईल. हा bot तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर तुम्ही वापरत असलेल्या Translator App ची तुम्हाला गरज पडणार नाही.

मी सगळ्याच aap बद्दल नाही सांगू शकत पण जर तुम्ही गुगल ट्रान्सलेट app वापरत असाल तर हे app तुम्ही मोबाईल मधुन काढून टाकल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये १९४ MB स्पेस रिकामी होईल. सोबतच ३२ MB Ram सुद्धा फ्री होईल. तसेच दिवस भर हे App तुमच्या मोबाईलच्या इंटरनेट data मधील १२-१३ MB data वापरते तो सुद्धा वाचेल. आणि ८ मिनिटे बॅटरी जास्त चालेल.

 

४. All Saver Bot (@allsaverbot) आणि Save Media  (@savemediabot)

या दोन्ही bot चे काम एकच आहे ते म्हणजे तुम्हाला हव्या असलेल्या युट्युब फेसबुक instagram किंवा इतर व्हिडिओ शेअरिंग साईट रील्स डाऊनलोड करून देणे. 

तुम्हाला फक्त या bot मध्ये जाऊन पहिल्यांदा start ला क्लिक करायचं आहे आणि मग नंतर त्या व्हिडीओ ची किंवा रील्स ची लिंक द्यायची आहे जो तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे. 

एक मिनिटामध्ये तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ डाऊनलोड होण्यासाठी तयार.

हा bot तुमच्या telegram मध्ये असेल तर तुम्हाला प्रत्येक appच्या व्हिडीओ डाऊनलोड करायला वेगवेगळ्या application ची गरज पडणार नाही.

 

५. Fake Mail Bot (@fakemailbot ) आणि Drop Mail – @DropmailBot

आजच्या सोशलमिडिया च्या जमान्यात इंटरनेट वापरत असताना अनेक वेगवेगळ्या वेबसाईटवर आपल्याला हव असलेल काम करत असताना आपल्याला अनेक वेबसाईटआपला ईमेल आयडीमागतात बऱ्याचदा त्याशिवाय लॉगीन करता येत नाही किंवा आपले काम अडकून बसते.

आणि एकदा का आपला ईमेल आयडी आपण दिला की त्यांचे spam ईमेल यायला सुरवात होते . 

अश्यावेळी हे दोन्ही bots आपल्या कामाला येऊ शकतात. हे bots आपल्याला तात्पुरता ईमेल आयडी बनवून देतात त्यावर आलेली व्हेरिफिकेशन ची लिंक सुद्धा आपल्याला क्लिक करता येते.

 

६. URL Shortner ( @URLShortenRobot )

बऱ्याचदा आपल्याला काही लिंक मित्रांना पाठवायच्या असतात आणि त्या लिंक खुप लांबलचक असतात.

आणि त्यामुळे मेसेज मोठा होऊन जातो आणि हे काय आलाय म्हणुन अनेक जण त्याला क्लिक सुद्धा करत नाहीत.

अश्या वेळी हा bot कामाला येऊ शकतो आपल्याला हवी ती लिंक या bot ला दिली की हा bot लगेच ती लिंक छोटी करून आपल्याला देऊन टाकेल.

 

७. File Converter ( @newfileconverterbot )

या हा bot आपल्याल्या वेगवेगळ्या मिडिया फाईल वेगवेगळ्या format मध्ये कन्व्हर्ट करून देईल.

 

८. Voicy Bot ( @voicybot )

हा bot आपल्याला कोणत्याही ऑडीओ फाईल मधील Voice ला वेगवेगळ्या भाषांमधील टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करून देईल.

 

९. OCR Bot ( @imagereaderbot )

तुम्ही जर कोणत्याही Image मधुन टेक्स्ट कॉपी करण्यासाठी गुगल लेन्स हे app वापरत असाल.

तर तेच काम हा bot करून देईल Image मधील टेक्स्ट कॉपी करून देईल म्हणजे या साठी सुद्धा तुम्हाला वेगळे app वापरण्याची गरज पडणार नाही.

 

१०. Dr. Web Bot ( @DrWebBot )

तुम्हाला जर कोणी एखादी फाईल पाठवली किंवा लिंक पाठवली असेल.

तुम्हाला संशय आहे की यात एखादा Threat असू शकतो. तर या bot च्या मदतीने तुम्ही ती स्कॅन करून पाहू शकता.

 

११.TroJanz KnoWho Bot (@KnoWhoHEXbot)

हा bot तर True Caller च्या हि पेक्षा अनेक पटीने Advanced आहे.

यात तुम्ही सर्च केलेल्या मोबाईल नंबर ला जोडलेले whatsapp, फेसबुक, telegram, instagram आणि ईमेल आयडी इत्यादी गोष्टी शोधून देऊ शकतो.



©वरुणराज कळसे



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button