

Harshada Ghate
Ayurvedic Benefits of Cumin
Ayurvedic Benefits of Cumin.
जिरे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे.
जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात. जाणून घेऊया जिरं खाण्याचे फायदे.
Table of Contents
त्वचेसाठी
जिरं हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याचं पाणी रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं आमि चेहऱ्यावरील अॕक्नेची समस्या दूर होईल. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन पासूनही रक्षण होतं. त्याशिवाय जिऱ्याचा उपयोग हा सोरायसिस आणि एक्झिमा हे आजार दूर करण्यासाठीही केला जातो. तुम्ही हवं असल्यास जिरा पावडरच्या वापर फेसपॅकमध्येही घालूनही करू शकता.
केसांसाठी
त्वचेला सुंदर करण्यासाठी जसे जिऱ्याचे फायदे आहेत. तसंच केसांसाठीही आहेत. केसांसाठी बाजारात जिऱ्याचाच वेगळा प्रकार असलेलं काळ जिरं मिळतं. या जिऱ्याचं तेल केसांना लावल्यास केस गळणं कमी होतं. रोज काळ्या जिऱ्याचं सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत होतात. याशिवाय ज्यांना कोड्यांची समस्या असेल त्यांच्यासाठीही काळं जिरं फायदेशीर आहे. कोंडा दूर करण्यासाठी तेलासोबत जिरं गरम करून घ्या. या कोमट तेलाने केसांना मसाज करा. 2 ते 3 वेळा हे तेल लावल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.
ताप
तापामुळे जेव्हा शरीर दूखू लागतं. तेव्हाच आपल्याला अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्यासोबत गूळ मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल. तसंच तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकता. जिऱ्यातील थंडावा अंगातील उष्णतेला त्वरित कमी करतो आणि ताप उतरतो.
सर्दी
थंडीच्या दिवसात नाक बंद होण्याची समस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रास बरेच दिवस होतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका येणं बंद होईल. तसंच जिरं हे बद्धकोष्ठ दूर करण्यात ही मदत करतं. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेलं जिरं घालून प्या. असं केल्याने लवकर बरं वाटेल.
पोटदुखी
पोटात कधीही दुखू शकतं. जेव्हा पोटात असह्य दुखत असेल तेव्हा एकदा हा घरगुती उपाय नक्की करून पाहा. पोटात जेव्हा दुखेल तेव्हा जिरं आणि साखर समान प्रमाणात 🥄मिक्स करा. हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाने लगेच फायदा होतो.
सांधेदुखी
मेथी, ओवा, जिर आणि बडीशोप सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण एक चमचा 🥄 रोज खाल्ल्याने डायबिटीज, सांधेदुखी आणि पोटाचे विकार होत नाहीत. तसंच गॅसची 💨 समस्येवरही याचा फायदा होतो.
कॉलेस्ट्रॉल
आजकाल कॉलेस्ट्रॉल वाढल्याचा 📈 त्रास बऱ्याच जणांना होतो. बरेच जणांच्या खाण्यापिण्यावर यामुळे मर्यादा येतात. जिऱ्याचं सेवन 🤌🏻 केल्यास तुमच्या कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.
(संकलन: आर्या देव)
🤗 माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.)
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🆁🅴 करा
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
