My title My title
BlogBrain StormingPost's
Trending

Why did Reliance buy a Dead Brand Campa Cola?

रिलायन्सने कॅम्पा कोला हा Dead Brand का विकत घेतला ?

Why did Reliance buy a Dead Brand Campa Cola?

Why did Reliance buy a Dead Brand Campa Cola?

रिलायन्सने कॅम्पा कोला हा Dead Brand का विकत घेतला ?

©सलिल सुधाकर चौधरी

लहानपणी ज्याच्यावर अन्याय झालाय असा हिरो मोठा होऊन बदला घेतो या धर्तीवरचे अनेक चित्रपट आपण पहिले असतील पण ज्याच्यावर अन्याय झाला आहे असा एक Brand पुढे आपल्या अन्यायाचा बदला घ्यायला तयार झालाय अशी गोष्ट अभावानेच पाहायला मिळते. मित्रहो, Reliance मुळे आपल्याला ही गोष्ट पहायला मिळणार आहे. Reliance ने नुकताच Campa Cola हा Soft Drink Brand २२ करोडला विकत घेतला आणि या दिवाळीत हा Brand नव्याने लाँच देखील होणार आहे. तुम्ही आम्ही कधी या Brandचे नावही ऐकलेले नाही. पण तुमच्या आई-बाबांना विचारून पहा, कदाचित त्यांना हा Brand आठवत असेल.

Campa Cola हा Brand pure drinks या कंपनीने १९७७ साली तयार केला. Pure Drinks या कंपनीनेच पहिल्यांदा Coca Cola भारतात आणले होते. ते Coca Colaचे भारतातील एकमेव मॅन्युफॅक्चरर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स होते. पण पुढे भारत सरकारने परदेशी कंपन्यांना ४०% भागीदारी भारतीय कंपन्यांना देण्याची सक्ती केली तेव्हा Coca Colaने भारतातून काढता पाय घेतला आणि पुढे १७ वर्षे Coca Cola भारतातून बाहेरच होते. ही रिकामी जागा भरायसाठी Pure Drinks ने स्वततःचा Brand बाजारात आणला आणि त्याचेच नाव होते कॅम्प कोला. Campa Cola दिसायला आणि चवीला एकदम Coca Cola सारखेच होते. Coca Colaची स्पर्धा नसल्याने Campa Cola चांगलाच बिझनेस करत होते. पण नंतर जेव्हा कोक आणि पेप्सी भारतात परत आले तेव्हा त्यांनी भरपूर पैसा, जबरदस्त मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशनच्या बळावर Campa Colaला बाजारातून बाहेर काढले. हळूहळू Campa Cola संपत गेला आणि शेवटी १९९९ ला कायमचा बंद झाला.

मग आता Reliance या ब्रॅण्डला पुन्हा नव्याने का लाँच करत आहे ? कारण हा Brand कधीच संपला आहे. Brand संपलेला असला तरी एक गोष्ट Campa Cola कडे अजूनही आहे…. ती म्हणजे Coca Colaच्या जवळ जाणाऱ्या चवीचा फॉर्म्युला !

Reliance आता मोठ्या प्रमाणावर FMCG मध्ये उतरत आहे. यासाठी त्यांना अनेक मोठेमोठे Brands आणावे लागतील. पेप्सी आणि कोक सारख्या मोठ्या ब्रॅण्ड्सबरोबर टक्कर घेणे सोपे नाही. Relianceने हा प्रयत्न आधीच करून पाहिला आहे. त्यांचा YEAH नावाचा एक सोडा Brand पण आहे. मात्र तो कुणालाच ठाऊकही नाही. Soft Drink कॅटेगरी मध्ये नवे ब्रॅण्ड्स आणणे सोपे नाही हे Relianceला ठाऊक आहे. त्यामुळे नवे ब्रॅण्ड्स उभे करण्यापेक्षा आधीच बाजारात असलेले ब्रॅण्ड्स आणण्यावर Relianceचा भर आहे.

आणि हो, Campa Cola कडे एक मोठं शस्त्र अजूनही आहे. ते म्हणजे त्या Brandचं भारतीयत्व…! सध्याच्या आत्मनिर्भरतेच्या लाटेवर आरूढ होऊन हा Brand भारतीयांच्या फ्रीजमध्ये जागा मिळवू शकतो.

त्याशिवाय भारताची FMCG बाजारपेठ वेगाने वाढत आहे. २०१३ मध्ये भारतीय Grocery FMCG मार्केट ३०० बिलियन डॉलर्सचं होतं, ते २०१९ साली ६०० बिलियन डॉलर्सचं झालं आणि २०२४ पर्यंत ८०० बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे जरी कोक बरोबर स्पर्धेत जरी जिंकले नाही तरी Campa Colaला चांगला सेल मिळेल.

Reliance Retail कडे आधीच १५ लाख दुकानं आहेत त्यामुळे डिस्ट्रिब्युशन वर पूर्ण नियंत्रण आहे. यासोबत Relianceची कमी किमतीत उत्पादने बाजारात आणून स्पर्धकांना आश्चर्यचकित करण्याची क्षमता तर आपल्याला माहीत आहेच. JIO Mobile ने जे केलं तेच Reliance Retail FMCG मध्ये करण्याची दाट शक्यता आहे. Reliance Retail आणखी एक स्ट्रॅटेजी नेहमी वापरते. त्यांच्या दुकानात मोठ्या ब्रॅण्ड्ससारखेच दिसणारे, जवळपास सारखी पॅकिंग असणारे छोटे private brands ठेवलेले असतात. ग्राहक बऱ्याच वेळा चुकून private brands कार्ट मध्ये टाकून घेऊन जातात. तुम्ही म्हणाल हे एव्हढ्याश्याने काय होतंय… पण मित्रानो अशा प्रकारची ग्राहकांच्या चुकीमुळे होणारी खरेदी पण काही करोड रुपयांच्या घरात आहे.

या सर्व कारणांमुळे Relianceने Campa Cola हा Dead Brand फक्त २२ करोडला विकत घेतला. या कॅटेगरी मध्ये कोक-पेप्सीला फारशी टक्कर न देता सुद्धा Campa Cola एवढा बिझनेस Relianceला सहज आणून देईल की २२ करोड सुट्या पैशांइतके वाटावेत. पण अंबानींचा विचार एवढ्यावरच समाधान मानायचा नक्कीच नसेल ! FMCG च्या या महायुद्धात पुढे HUL, ITC, PARLE, TATA, GODREJ अशा अनेक कंपन्या समाविष्ट होतील…. बराच काळ शांत असलेलं हे क्षेत्र Reliance कशाप्रकारे ढवळून टाकेल हे पाहणं नक्कीच interesting असेल !

Why did Reliance buy a Dead Brand Campa Cola?

रिलायन्सने कॅम्पा कोला हा Dead Brand का विकत घेतला ?

 

Source

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button