My title My title My title My title
Brain Storming

सोशल मीडियावर चालणारे भारतीय Politics शाप की वरदान…?

सोशल मीडियावर चालणारे भारतीय Politics शाप की वरदान…?



@अभिजीत ढोणे



मला आठवतय साधारण  2006-2007 मध्ये  ऑर्कुट पासून Social media वापरायला सुरुवात केली होती.

एवढे वर्षे मित्र मित्र जे काही असतं ते आपल्या डायरेक्ट संपर्कातून बनलेले असे होते. मग ते शाळा असो कॉलेज असो की ऑफिस अन घरच्या आजुबाजूला एवढाच काय तो मित्रमंडळींचा गोतावळा असायचा पण ऑर्कुट वापरण्याला सुरवात झाली आणि मुंबई,  महाराष्ट्र,  दिल्ली काय स्पेन,  पोर्तुगाल पर्यंत फ्रेंड्स बनू लागले, scrapbook मध्ये रोजच्या रोज scraps मुळे ओळख वाढू लागली….

कधीही न पाहिलेले ना भेटलेले Virtual जगा मधले virtual friends बनायला लागले.

त्यावेळी सोशल मीडिया चा उपयोग फक्त अन फक्त time pass सारखा होत असायचा, त्यावरचे friends फक्त अन फक्त स्क्रॅप पुरते मर्यादित होते.

खरी मैत्री आपली शाळेच्या, कॉलेज च्या दोस्तां बरोबर होती तीच होती.

jr kg पासून चा मित्र अजूनही भेटून सुख दुःख शेअर करतो त्याचं सगळ्यात मोठं श्रेय सोशल मीडिया ला द्यावच लागेल.

2008 पासून ऑर्कुट कडून मोर्चा वळला तो Facebook कडे, अताशा बटन वाले का होईना पण फेसबुक चालवता येण्यासारखे मोबाईल यायला लागले होते.

हळू हळू आपली समोरा समोर भेटून गप्पा मारणारे friends पण Facebook च्या आपल्या list मध्ये यायला सुरु झाले.

अन त्याच बरोबर अनोळखी  जे कधीही बघीतले नाही अन भेटले नाहीत असेही लोक friends बनायला सुरू झाले. अन messenger च्या मार्गातून रोजच्या गप्पा daily routines, आवडी निवडी,  thoughts sharing etc. होऊ लागले.

social media रुपी internet वरील राक्षस हळू हळू कधी Facebook, WhatsApp, Twitter, Instagram अश्या एक ना अनेक रूपं घेऊन मोठा होऊ लागला.

त्याला जोड मिळाली technology ची मोबाईल पण update झाले. अख्ख्या  जगात कुठे काय घडतंय पासून आपल्या मित्राच्या status बघून ह्यावेळी काय करतोय ते कळू लागल.

 मी ही कधी ह्याच राक्षसाला मोठा करण्यात हातभार लावत गेलो कळूनच आल नाही.

अस म्हणतात की आयुष्यात कितीही मित्र भेटले तरी शाळेतले, कॉलेज चे मित्र म्हणजे जीव की प्राण असतात त्यांची सर कुणालाच येत नसते.

मी अन मित्र पण सोशल मीडिया वर आलो,  त्यानंतर आमचे खूप प्लॅन्स बनायचे, पार्टी असो, कुणाचं लग्न असो,  की कुणाच्या घरी कुणी मेल गेलं तरी ह्याच सोशल मीडिया मुळे पटापट गोष्टी शेअर होत गेल्या.

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया च स्वरुप बदलायला सुरवात झाली…

मित्र , नातेवाईक,  आणि time pass पुरता असलेल्या सोशल मीडिया नामक राक्षसाला Politics नावाच वरदान / शाप भेटलं…

रोजच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या 7:30 च्या ठळक बातम्यां पुरते असलेल्या राजकिय घडामोडी दिवसभर सोशल मीडिया वर यायला लागल्या.

Pages create झाले, group’s बनू लागले, त्यावरुन दिवसभर राजकिय पोस्ट पडू लागल्या त्या viral होऊ लागल्या आपल्यातले लोक पण अश्या ग्रुप वर join झाले,  त्यावरच्या पोस्ट्स शेअर करू लागले…

शाळा, कॉलेज च्या WhatsApp ग्रुप वर पण ह्या राजकिय पोस्ट्स चा शिरकाव होऊ लागला आणि तिथेच मित्रा मित्रांमधल्या एवढ्या वर्षांच्या निखळ मैत्री ला दृष्ट लागायला सुरवात झाली.

एवढी वर्ष jr kg पासूनचा जिगरी असलेला Nilesh आज एका XXX च्या पार्टी चा supporter म्हणून ग्रुप वर बोलला जाऊ लागला. 

कुणी Ajay आज XXX च्या सपोर्ट मध्ये येऊन आपल्याच वर्षानुवर्ष जीव लावलेल्या मित्रा बरोबर हातघाईवर येऊन भांडू लागला. 

कुणी XXX च्या सपोर्ट साठी आपल्या 20 -25 वर्षे मैत्री ला विसरून ग्रुप सोडून आपल्या मित्रांशी रुसवा धरू लागला…

कुणी दिवसरात्र आपल्या wall वरुन ह्याच अश्या राजकीय पोस्ट शेअर करू लागला.

ज्या सोशल मीडिया ने मित्राना एका ग्रुप मध्ये परत एकत्र आणल होतं त्याच सोशल मीडिया मुळे आज किती तरी मित्रांची निव्वळ राजकीय topic मुळे भांडण होताना दिसायला लागलीत.

राजकारण हा विषय जेवणात मीठ असतं तेवढाच असावा. तोंडी लावण्यापुरता…! काही जण मिठालाच जेवण समजतात आणि आयुष्य खारट करून घेतात.

कित्येकांची वॉल फक्त याच हागणदारीनेच बरबटून गेलेली दिसते. राजकारणाशिवाय पोस्ट टाकायला दुसरा विषयच नाही यांच्याकडे.

ही लोक फेसबुकवर एवढी जहरी असतील तर प्रत्यक्ष आयुष्यात किती विष ओकत असतील आणि त्याचा परिणाम जवळच्या लोकांवर, मित्रांवर, कुटुंबीयांवर किती वाईट होत असेल हाच विचार मनात येतो.

महाराष्ट्रात आता पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणारेत… राजकीय धृवीकरण आहेच ते बदलणं आज तरी शक्य नाही..

गेल्या काही दिवसांपासून राजकीय आशय असलेल्या पोस्ट करण्याचा कंड सगळीकडे वाढतांना दिसतोय..

पण आपापली राजकीय हागणदारी आपापल्या वाँलवर आपण मर्यादित ठेवली तर निदान हा गृप तरी कुटुंब म्हणून जपता येईल…

आपण आपल्या ह्या कुटुंबात ही घाण घुसणार नाही, ह्याची काळजी घेऊया आणि आपल्यातली मैत्री निखळ ठेवून आयुष्यातले सोनेरी क्षण enjoy करुयात…

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button
improve alexa rank