My title My title My title My title
Brain StormingSomething Different

Relation Between 7 Chakras of Human Body & Sleep

Relation Between 7 Chakras of Human Body & Sleep

शरीरातील सात चक्र आणि निद्रा (झोप) ह्यामधील गुढ संबंध काय आहे?



©Anna®2021



“निद्रा” परमेश्वराने पृथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्राला दिलेली एक दिव्य देगणी आहे. चिंतामुक्त झोप मिळणारे ह्या पृथ्वीवर खूप कमी भाग्यवान असतात.

निद्रा/झोप ही अशी देगणी आहे जी सगळ्यांच्याच नशीबात नसते. अहंकार, मोह, मत्सर असणार्‍या व्यक्तिस शांत निद्रा मिळणे खूप कठीण गोष्ट आहे.

ह्या निद्रेचा आपल्या शरिरातील सात चक्रांशी खूप जवळचा संबंध आहे.

अनेक लोकांना प्रश्न पडेल की, आपल्या शरीरातील गुढ रहस्यमयी सात चक्रांचा आणि आपल्या निद्रेचा कसा काय संबंध आहे?

हा लेख ज्यावेळी तुम्ही ध्यानपूर्वक वाचाल त्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर अवश्य मिळेल. ह्या सृष्टीतील असीम दिव्य शक्तिंपैकी एक शक्ती आहे निद्रा!

परमेश्वराने सृष्टी निर्माण करताना प्रत्येक प्राण्याला ही शक्ती बहाल केली आहे. आज आपण शरीरातील सात चक्र आणि गुढ निद्रेचा जवळचा संबंध कसा आहे ते सविस्तर पाहूया.

आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहेत मुलाधारचक्र, स्वाधिष्ठानचक्र, मणिपूरचक्र, अनाहतचक्र, विशुद्धचक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रारचक्र.

तसेच ह्या चक्राशी संबंधित सिद्ध ऋषीमुनींनी निद्रेचे सात प्रकार सांगीतले आहेत ते चक्राशी कसे संबंधित आहेत ते पाहूया.

१) भौतिकनिद्रा- मुलाधार
२) प्राणाधारनिद्रा- स्वाधिष्ठान
३) काम/ विद्युत केंद्र निद्रा- मणिपूर
४) नैतिक/ सौंदर्यपूरक निद्रा- अनाहत
५) धार्मिक निद्रा- विशुद्ध
६) अध्यात्मिक निद्रा- आज्ञा
७) दिव्य निद्रा- सहस्त्रार

जो व्यक्ती साधनेमध्ये मुलाधार चक्राच्या अवस्थेमध्ये असतो त्याची निद्रा (झोप) गाढ व शांतपणे होवू शकत नाही.

त्या व्यक्तीची झोप उलट असते कारण तो शरीरसुखामध्ये आणि भौतिक सुखामध्ये जगत असतो.

साधनेमध्ये जसजसे तुम्ही वरच्या स्तरावर जाल तसतशी तुमची निद्रा/ झोप गुढ होत जाते आणि तुमच्या निद्रेची गुणवत्ता बदलत जाते.

जो व्यक्ती अधिक भोजन करतो आणि फक्त खाण्यासाठीच जगतो त्या व्यक्तीला झोप जास्त असते मात्र त्याची झोप चंचल असते, त्याची निद्रा शांत नसते.

अशा व्यक्तींची निद्रा दु:खमय स्वप्नांची असते. ज्या व्यक्तीचे स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्र जागृत अवस्थेमध्ये असते.

त्या व्यक्तीला भोजणामध्ये स्वारस्य नसते, अशा अवस्थेमध्ये व्यक्ती भोगवस्तूंमध्ये गुंतून न राहता जनसमुदाय/ लोकांमध्ये मिसळून आनंद निर्माण करते त्याची निद्रा गहन होत जाते मात्र पूर्ण गाढ झोप लाभत नाही.

अशी व्यक्ती अंशत: गुढ निद्रेमध्ये असते. अंशत: कामुक व्यक्तीची झोप अधिक गाढ निद्रेची असते, लैंगिक संबंधानंतर एक प्रकारची शांत झोप लागते.कारण शारिरीक गरजा पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक गाढ झोप लागते.

हेच कारण आहे की, परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला कामवासना दिलेली आहे. लैंगिक संबंधाचा उपयोग ट्रॅक्युलाइजर ह्या नशेसारखा केला जातो.

ज्यावेळी तुम्ही साधनेमध्ये वरच्या चक्राकडे जाता म्हणजेच चौथे चक्र अनाहत चक्र जागृत झाल्यानंतर तुमची निद्रा अत्यंत निष्कंप, शांत, पवित्र आणि परीष्कृत होते.

जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता त्या प्रेमरूपातून तुम्हाला जे आत्मिक समाधान मिळते त्यामुळे तुमची निद्रा अनोख्या निद्रेमध्ये रूपांतरीत होते.

ज्यावेळी तुम्ही एखाद्यावर प्रेम करता आणि तुमच्यावर ती व्यक्ती प्रेम करत असेल तर त्यानंतर तुमचे शरीर आल्हाददायक आनंददायी निद्रेमध्ये रूपांतरीत होवून तुम्हाला शांत झोप लागते.

खरा प्रेमी व्यक्तीच गुढ निद्रेचा आनंद घेवू शकतो. एखाद्याबद्दल तुम्ही तिरस्कार करत असाल तर तुम्ही शांत झोपूच शकत नाही.

तुमच्यामध्ये क्रोध असेल तर तुम्ही शांत झोपेचा आनंद घेवू शकत नाही तसेच क्रोधामुळे तुमचा अध्यात्मिक स्तर खाली येतो.

म्हणून निर्मळ, निस्वार्थी प्रेम करा, एखाद्या बद्दल करूणा व्यक्त करा तुम्हाला शांत झोप लागेल.

ज्या व्यक्तीचे विशुद्ध चक्र जागृत अवस्थेमध्ये असते त्या व्यक्तीची झोप प्रार्थनास्वरूप बनते.

ह्यासाठीच प्रत्येक धर्मामध्ये नेहमी सांगीतले जाते की, झोपायच्या आधी प्रत्येकाने ईश्वराची प्रार्थना करावी. प्रार्थनेला तुमच्या निद्रेबरोबर जोडावे, देवाची प्रार्थना केल्याशिवाय कधीही झोपू नये.

कारण तुमचे पाचवे चक्र जागृतावस्थेत असेल तर तुम्ही झोपेतही गुढ संगीताची स्पंदने ऐकू शकाल. प्रार्थनेचा प्रतिध्वनि तुमच्या निद्रेला शांत गुढ संगीतमय स्पंदनात रूपांतरीत करतो.

पाचवे चक्र म्हणजेच ईश्वराची प्रार्थना आहे. जर तुम्ही झोपायच्या आधी देवी/देवताची प्रार्थना (मंत्र) करत झोपला तर दुसर्‍या दिवशी तुम्ही सकाळी आपोआपच देवाची प्रार्थना करतच उठता हा खूप गुढ, आश्चर्यजनक बदल तुम्हाला स्वत:मध्ये काही दिवसातच जाणवेल.

दुसर्‍या दिवशी सकाळी तुम्ही झोपेतून उठणे ही सुद्धा एक प्रकारची प्रार्थनाच होवून जाईल. ही निद्रा सर्वसामान्य निद्रा नसते. तुम्ही पाचव्या चक्रामध्ये निद्रेमध्ये जात नाही.

तुम्हाला असे वाटते की तुम्ही गाढ झोपेत आहात परंतु पाचव्या चक्र जागृत अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही सुक्ष्म रूपाने ईश्वरी तत्वाशी जोडले जाता.

निद्रा हे एक असे व्दार (दरवाजा) आहे जिथे तुम्ही अहंकार, क्रोध, मोह, मत्सर पूर्णपणे विसरून जाता. जे तुम्ही जागृत अवस्थेमध्ये अनुभवू शकत नाही ते तुम्ही निद्रेमध्ये अनुभवू शकता.

कारण जागृत अवस्थेमध्ये तुमचा अहंकार खूप शक्तिशालीपणे शरीरामध्ये प्रवाहीत असतो.

ज्यावेळी तुम्ही शांत, गुढ निद्रावस्थेमध्ये प्रवेश करता त्यावेळी तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होवू शकते.

ह्यासाठीच डाॅक्टरसुद्धा नेहमी सांगतात की, झोपताना भलतेसलते विचार, काळजी मनात न आणता शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करावा.

जो व्यक्ती शांतपणे झोपू शकत नाही तो नेहमी काही ना काही आजाराने ग्रासलेला असतो. कारण उत्तम आरोग्य हे अंतर्मनाच्या शक्तीतून निर्माण होते.

शांत झोप घेणार्‍या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्तीही खूप शक्तिशाली असते. शांत झोपणारा व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करतो.

जो व्यक्ती पाचव्या शरीरचक्रापर्यत पोहोचला आहे त्याला अहंकार नसतो.

त्याचे जीवन, शरीर निर्मळ झालेले असते, अशी व्यक्ती कुठेही चालताना, बोलतानासुद्धा त्या व्यक्तीच्या चालण्यातून, वागण्यातून, आवाजातून दैवी स्पंदने पुढच्या व्यक्तीला नेहमी जाणवतात.

आज्ञा चक्र हे अंतिम चक्र आहे जिथे निद्रा श्रेष्ठ, उच्च पदावर पोहोचते. व्यक्तीला ह्याच्या पलीकडे झोपेची गरज नसते.

ह्यानंतर आज्ञाचक्र जागृत व्यक्तीचे निद्रावस्थेतील कार्य समाप्त होते. सहावे चक्र ज्याला आज्ञाचक्र म्हटले जाते ह्या चक्रापर्यत व्यक्तीला निद्रेची आवश्यकता असते.

सहाव्या चक्रजागृतीमध्ये निद्रा ध्यानरूपात रूपांतरीत होते. प्रार्थना तेव्हाच पूर्ण होते ज्यावेळी तुम्ही ध्यानरूपात जाता.

कारण प्रार्थना एक माध्यम आहे. मी आणि तुम्ही, भक्त आणि ईश्वर ह्यामधील अंतर पार करण्यासाठी प्रार्थना (मंत्रसाधना) हे एक माध्यम आहे.

सहाव्या चक्रजागृतीनंतर प्रार्थना (मंत्रसाधना) ह्या माध्यमाला महत्व राहत नाही.

ह्यानंतर तुम्ही निद्रेमध्येही ध्यानावस्था प्राप्त करू शकता. ह्याला दिव्य निद्रा असे म्हणतात. ज्या व्यक्तीचे आज्ञाचक्र भेदून सहस्त्रार चक्र जागृत अवस्थेमध्ये असते तो व्यक्ती दिव्य निद्रा प्राप्त करू शकतो.

अशी सिद्ध व्यक्ती निद्रावस्थेमध्ये गूढ, रहस्यमयी ब्रम्हांडामध्ये खोलवर जावू शकते. ही गुढ रहस्यमयी निद्रा म्हणजेच एक प्रकारचा छोटासा मृत्युच असतो.

कारण तुमचे सुक्ष्म शरीर तुम्ही गाढ झोपेत असताना तुमचा देह सोडून ब्रम्हांडातील दिव्य शक्तिंमध्ये एकरूप होत असते.

ज्यावेळी ही अवस्था प्राप्त होते त्यावेळी तुम्ही अनेक गुढ मंत्राचे अधिकारी होवू शकता.

एखाद्याच्या स्वप्नामध्ये जावून मंत्र सांगू शकता किंवा एखाद्याजवळ सुक्ष्म शरिराने जावून आपले कार्य पूर्ण करू शकता.

ज्यावेळी तुम्ही ह्या स्तरावर पोहोचता त्यावेळेपासून तुमचे मानवी कार्य समाप्त होवू लागते.

तुमचे हजारो शिष्यगण तुमच्या दर्शनाने आणि दिक्षेने मोहीत होवून वैयक्तीक आयुष्य सुखाने जगू लागतात.

ज्याला ही अवस्था प्राप्त होते तो व्यक्ती मोह मायेच्या पलिकडे ऐहिक, भौतिक सुखाच्याही पलीकडे दिव्य रहस्यमयी दुनियेमध्ये प्रवेश करतो.

त्यानंतर तुम्हाला झोपेची आवश्यकता कधीही भासत नाही. २४ तासात एखादा दुसर्‍या तासाची झोपसुद्धा तुम्हाला पुरेशी असते.

तुम्ही कीतीही काम केले तरी तुम्ही थकत नाही, तुमचा चेहरा कीतीही काम केले तरी थकलेला, दमलेला दिसत नाही.

तुमचा चेहरा सदैव तेजस्वी दिसतो.

तुम्ही रंगाने सावळे असा कींवा गोरे असा परंतु अशा सिद्ध व्यक्तीकडे पाहील्यावर हजारो लोक मोहीत होतात.

हजारो लोकांसाठी तुम्ही गुरू कींवा देवपदापर्यत आपोआप पोहोचता.

ही अवस्था म्हणजेच सातव्या चक्राची अवस्था असते.

विशुद्ध आणि आज्ञाचक्र भेदून सहस्त्रार चक्र जागरणाची ही अवस्था असते. जो खरा सिद्धपुरूष असतो तोच ही अवस्था प्राप्त करतो.

टिप- पुरातन ग्रंथाच्या आधारे लिहला आहे. ह्याची कृपया नोंद घ्यावी.



©Anna®2021 (7249157379)



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button
improve alexa rank