HealthMental Health
लोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…!

लोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…!
कोणी आपल्याशी वाईट वागलं की आपण तिथे तर सहन करतो आणि परत म्हणतो “परिस्थितीच तशी होती म्हणून मला सहन करावं लागलं….”
सरळ मार्गाने चालणारी माणसं कदाचित थोडी चिडकी असू शकतात पण वाईट वृत्ती ठेऊन वागणाऱ्यातली नक्कीच नसतात….
दुसऱ्यांना बरं वाईट बोलणारे आणि उगीच नाव ठेवणारे लोक कधीही त्यांच्या आयुष्यात आनंदी नसतात तेव्हाच, ते तसे वागू शकतात….
भलेही त्यांच्या दाखवण्यावरून आपल्याला वाटेल की हा स्वतः तर मजेत आहे आणि दुसऱ्याला त्रास देतो; पण असे नाही… जो आनंदी, सुखी, समाधानी, आहे त्याला वेळच नाही आनंद सोडून कुटाने करायच्या मागे लागायला….
अरे आनंदाला आनंदच हवा असतो आणि दुःखाला दुख… आनंद ज्याच्या आयुष्यात असतो ती व्यक्ती फक्त त्या आनंदाचा उपभोग घेण्यात रमून असते…
मला वाटतं कुठलीच परिस्थिती आपल्याला कमजोर नाही बनवू शकत जोपर्यंत आपल्यावर पुढची चिंता हावी होत नाही….
कोणी काही निरर्थक आणि चुकीचं बोललेलं देखील आपण सहज ऐकून घेतो व मनात त्या गोष्टींचा विचार करून आपला दिवस खराब करतो. त्याची दोन कारणं असतात…
एक म्हणजे ‘त्या व्यक्तीचं दुसऱ्याशी वागताना बघितलेलं रूप’ आणि दुसरं म्हणजे ‘त्याला बोलण्यात आपण हरवूच शकत नाही’ ही गोष्ट….
त्याने त्याची पातळीच सोडलेली असते तेव्हा आपण त्याच्या थराला नाही जाऊ शकत….. मात्र त्याच्यापासून लांब राहण्याचे मार्ग शोधू शकतो…
बोलणाऱ्यांना तर तसाही फरक पडणार नाही मात्र मनाचं खच्चीकरण आपल्या होईल. मग तो चुकीचं वागून देखील यशस्वी तर झालाच ना?
15 टिप्स ज्यामुळे मनावरचा ताण कमी होऊ शकतो.
2)
ज्या लोकांचा मूळचा स्वभाव आपल्याला माहित आहे त्या लोकांची नियत देखील आपल्याला माहिती असते, मग त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःला त्रास देण्याचा हक्क त्याला देणंच आहे.
3)
दुसऱ्यांच्या बोलण्यावरून स्वतःला जज करू नये….समोरच्याने आपल्याला तेवढेच बघितले आहे जेवढे तो बोलतोय.. पण आपल्याला नक्कीच माहिती आहे की आपण काय आहोत.. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून स्वतःचे मत बदलवू नये…
4)
आनंदामध्ये त्या व्यक्तीची पूर्वीची वागणूक विसरू नये…
असे लोक जेव्हा काही वाईट बोलतात तेव्हा तर आपण एवढं नाराज होतो मग आपलं त्यांनी कौतुक केल्यावर कसं खुश होतो आणि लागतो त्यांना सर्व share करायला.
5)
त्यांच्या सोबत वेळ घालवणे टाळायला हवं…
सवईप्रमाणे जुने सर्व विसरून त्याच्याजवळ परत आपण आपुलकीने जातो आणि त्याच्या आजच्या चांगल्या बोलण्या-वागण्याला विसरतो सर्व…
6)
अशा लोकांशी हाथ राखून वागता आले पाहिजे….
ज्या लोकांची वृत्ती दुसऱ्यांना त्रास देणं आहे ते कधीही बदलू शकत नाहीत तेव्हा त्यांच्या चांगल्या बोलण्याला न फसता पळवाट काढणे योग्य….
7)
अशा लोकांना आपण कुठली गोष्ट का केली याचं स्पष्टीकरण देत बसू नये…
जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचं समजत असेल तर ती तशीही आपल्याला चुकीचीच समजणार आहे…
त्यासाठी त्यांना जास्त समजावत बसने चुकीचेच ठरेल.. जेवढं स्वतःला आपण prove करायला जाऊ तेवढीच ते आपली परीक्षा घेऊन बघतील…
त्यांना का ऑथॉरिटी द्यायची आपल्याला नाचवायची…..

9)
आपल्या आवडीच्या गोष्टी बाजूला ठेवून अशा लोकांसमोर स्वतःला त्यांना हवं तसं present करने बंद करावे जी व्यक्ती त्याच्या चुकीच्या खोट्या चष्म्यातून आपल्याला बघते तिथे स्वतःचं मन मारून स्वतःची खोटी मूर्ती बनवण्यापेक्षा….
आपण जे जसे आहोत बस तसेच राहावे..
10)
आपली जबाबदारी आणि आपली कर्तव्य नीट पार पाडत असताना त्यात काय करायचं आणि काय नाही कुठली गोष्ट आधी करायची कुठली नंतर याचा क्रम दुसऱ्यांकडून घ्यायची गरज नाही हे स्वतःला समजावावे….
जी गोष्ट अशीही आपल्यालाच करायची आहे आणि तशीही आपल्यालाच त्यात कोणाचा timetable स्वतःला लागू करून द्यायची गरज नाही….
आपल्याला काही कळत नसल्यावर नक्कीच मोठ्यांचा आणि अनुभवी लोकांच मार्गदर्शन घ्यावं.
पण जी माणसं स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची कर्तव्य न करता फक्त दुसऱ्यांना शिकवायला येतात त्यांचं ऐकून घेणे टाळावे.
11)
“रडून ऐकायचं आणि हसून सांगायचं” अशा प्रकारच्या category पासून लांब राहावे…
अगदी आपल्या एवढंच दुःख त्यांना देखील झालंय असं दाखवून आपल्या दुःखात सहभागी झाल्याचे नाटक करनारे बरोबर वेळ आली की हीच गोष्ट बदलून लोकांसमोर आपल्या दुःखाचा बाजार मांडायला कमी करत नाहीत….
जास्तच दुःख झालं तर एकट्यात जाऊन हवे तेवढे रडून घ्यावे पण या लोकांजवळ मन मोकळं करू नये……
12)
अशा प्रकारच्या लोकांमुळे आपली बाकी जवळच्या लोकांशी नाती दुरावणार या भिती मुळे आपण बरेचदा ह्यांची चुकीची वागणूक सहन करतो….
अरे जी नाती खरी आहे त्यामध्ये अशे कितीही लोक आले आणि गेले तरीही कोणी दरार नाही पाडू शकत….
छोटे मोठे गैरसमज होऊ शकतील पण जी माणसं आपल्याला ओळखून असतात ती आपल्याबद्दल कुठलिही समज तयार करणार नाहीत……
13)
जी माणसं आपल्याला आपल्याच नजरेत खाली पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांची संगत टाळावी…..
स्वतःला जेव्हा आपण encourage करू शकत नाही तेव्हा दुसऱ्याचं ऐकून स्वतःलाच discouraged कसं करू शकतो आपण?
हा प्रश्न नक्कीच एकदा स्वतःला विचारावा…
14)
अशा लोकांशी झालेला वाद किंवा कुठलं संभाषण सतत आठवून स्वतःला त्रास करून घेणे थांबवावे….
बरेचदा आपल्याला सहन झालं नाही म्हणून उलट काही आपण बोलून जातो आणि दिवसरात्र तीच situation डोळ्यांसमोर फिरवत ठेवतो ज्यामुळे कशातच आपण divert होऊ शकत नाही….
म्हणून स्वतःला समजावता येणं देखील गरजेचं आहे….
15)
त्रास देण्याऱ्या लोकांच्या सांगण्यावरून कोणत्याही कारणामुळे आपण ठरवलेले काम कॅन्सल करू नये….
बरेचदा आपले काही plans तयार केलेले असतात की वेळ मिळाल्यावर हे करायचं आहे ते करायचं आहे आणि तयारी देखील करायला लागलेलं असतो व असे लोकं काय म्हणतील आणि काय बोलतील या टेन्शन मुळे आपली सर्व इच्छा मारायला लागतो…
तसे करने अगदी चुकीचे…
बाकी टिप्स पुढच्या पोस्ट मध्ये….
काही चूक झाल्यास माफी असावी…





आवडल्यास Like आणि Share करा.
©सौ. वैष्णवी व कळसे