Ouija Board – A real Haunted Incident

Ouija Board – A real Haunted Incident
©प्रथम वाडकर
मित्रांनो, Ouija board बद्दल सर्वसाधारण तुम्हाला माहिती असेलच.प्लांचेट करण्यासाठी या Ouija board चा उपयोग केला जातो.
या Ouija board गेम द्वारे आत्म्याना आवाहन करून बोलावले जाते व आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे विचारली जातात वगैरे वगैरे…
आता या board च अजुन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ज्या कोणी या board गेम चा शोध लावला त्याला या board च नाव क़ाय ठेवावे हा प्रश्न पडला.
तेव्हा त्यानेच board ला याच नाव क़ाय ठेऊ विचारल तेव्हा अचानक board वर मूवमेंट सुरु झाली.
त्या board वर असलेले ऍरो अनुक्रमें एक एक शब्दांवर येऊन थांबत होते.
O U I J A यावर थांबुन संकेत देउ लागले पण याचा प्रॉपर अर्थ क़ाय अस त्या इसमाने विचारल असता पुन्हा एरो मूवमेंट झाली.
मग तो G O O D L U C K या शब्दांवर येऊन स्टॉप झाला.
एका स्पिरिट गेमला डेविल नेच दिलेले हे नाव Good luck म्हणून आहे.
आता हा गेम खेळताना तुमच लक गुड असणार की bad हे डेविलच ठरवतो हा एक त्यामागे अर्थ आहे.
पण याची स्पेलिंग OUIJA (ओइजा) असल तरी त्याचा उच्चार Ouija board म्हणूनच केला जातो.
या Ouija board मुळे स्पेन 1992 मधे घड़लेली घटना जी खूप हृदयद्रावक होती..
स्टेफनिया लझारो नावाची ही मुलगी जिच्या कड़े हा Ouija board होता. ति सतत तो आपल्या बरोबर कॅरी करत असे.
ति 10 वर्षाची असताना तिचे वडील गेले होते म्हणून Ouija board थ्रू आपल्या वडिलांच्या आत्म्याला बोलवायच अस तीच्या मनात कित्येक दिवस चालल होत.
ही मुलगी शाळेत जाताना पण तो board घेऊन जात असे असच एक दिवस लेक्चर ऑफ होत, बाकी सर्व मूले प्ले ग्राउण्ड़ वर गेली होती.
ही एकटीच क्लास रूम मधे थांबुन Ouija board काढून वडिलांच्या स्पिरिट ला कॉन्टैक्ट करू लागली, हळू हळू त्यात मूवमेंट व्हायला लागली पण ऐन वेळेस तिथे क्लास टीचर आली.
हा चाललेला तो प्रकार पाहून ति स्टेफनिया जवळ आली आणि तिने रागारागाने तो Ouija board फाडून फेकून दिला.
हा board फाड़त असता त्या क्लासरूम मधे अचानक एक थंड वार्याची झुळूक येऊन एक black फिगर स्टेफनिया च्या मागे दिसू लागली.
स्टेफनिया तो फाटलेला board उचलून घरी आली पण त्या दिवसा पासून तीच्या आयुष्यात अत्यंत वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाली.
ति black फिगर सतत तीच्या भवती घुटमळत असे.
स्टेफनिया च्या वागणूकीत विचित्र बदल झाले होते, तीने स्वतःला च एक रूम मधे बंद करून घेतल होत.
शाळेत ही जायच सोडून दिल.
फॅमिली शी खूप तुटक पणे वागु लागली तर कधी कधी panic होऊन आपल्याच फॅमिलीवर अटैक करू लागली होती.
तिने दोन वेळा आपल्याच सख्या भावाला जीवानीशी मारण्याचा प्रयत्न केला होता.
स्टेफनिया तीची रूम बंद करून कोणाशी तरी बोलत असे मधेच किंचाळत असे,जोरजोरात रडत असे.
एक दिवस नॉर्मल असताना ति फक्त तीच्या आईला एवढंच बोलली कि आई मला एक अदृश्य शक्ति खूप त्रास देते.
मला ती लवकरच तीच्या सोबत दूसर्य्या जगात घेऊन जाणार म्हणून सांगते, जर त्या शक्तिचा बंदोबस्त केला तर पुढच्या जन्मात पण ति मला असाच त्रास देणार आहे.
अस बोलून माझ्या शरीरात प्रवेश करते व मला माझ्या कडून शारीरिक हानी करवून घेते अस बोलण चालू असता तीच्या शरीरात पुन्हा त्या शक्तिचा प्रवेश होतो.
ति जवळपास हवेत आधानतरी उचलली जाऊन जमिनीवर आपटली जाते. हे चालूच रहात….
हा प्रकार बघून फॅमिली प्रिस्ट व पेरानॉर्मल एक्सपर्ट्स,आणि पोलिसांना ही कॉल करून बोलावते.
प्रिस्ट,आणि एक्सपर्ट आपल्या परिने प्रयत्न करत असतात पण हे करत असता त्यातील एक लेडी एक्सपर्ट अचानक पजेस होते.
हा प्रकार पोलिसांना ही अचंबित करून जातो पण त्या अमानवीय शक्ति पुढे कोणाच काही चालत नाही शेवटी स्टेफनिया चा त्यातच मृत्यु होतो.
शेवटी तो आत्म्या तीला बोलल्या प्रमाणे आपल्या जगात घेऊन जातो.
या घटनेनन्तर बरेच दिवस त्या फॅमिली सोबत बऱ्याच विचित्र घटना घडत होत्या.
स्टेफनियाच्या मृत्यु नंतर ही त्या रूम मधून स्टेफनिया चा डिमन बरोबर बोलण्याचा आवाज येत असे.
रात्रि अपरात्री त्या रूम चे दरवाजे आपोआप उघडून जोरात बंद होत असत. शेवटी त्या फॅमिली ने ते घरच सोडून दिल.
पोलिसांनी ही ती केस पैरानॉर्मल घटनेशी संबंधित केस असून त्या मुलीचा मृत्यु एका अमानवीय शक्ति द्वारे झाला असल्याची नोंद केली.
म्हणून केस क्लोज करण्यात आली..
हा गेम सुरु केला की अर्ध्यावर सोडायचा नसतो हा याचा अस्खलित नियम आहे आणि तो गेम अर्ध्यावर च तोडल्या मुळे हा भयंकर प्रकार घडला होता.