My title My title My title My title
Something Different

Techno Frauds- टेक्नो फ्रॉड्स (UPI Frauds)

Techno Frauds……



©अनिकेत परशुराम आपटे,

एस.व्ही.सी. बँक मुंबई.



मंडळी, हल्ली अनेक टेक्नो-फ्रॉड्सच्या घटना ऐकायला मिळतात. आठवड्यातून २-३ तरी केसेस असतातच.

टेक्नो-फ्रॉड्स म्हणजे टेक्नोलॉजी किंवा तंत्रज्ञान वापरून, समोर न येता खात्यातून पैसे लंपास करणे.

यात दोन प्रकार आहेत. पहिला आहे ATM Cloning आणि दुसरा UPI Transactions आज मी दुसऱ्या प्रकारावर थोडा प्रकाश टाकणार आहे…

Fraud by UPI Transactions:-
आपल्याला एक फोन येतो. फोन करणारी व्यक्ती सांगते की के.वाय.सी.अभावी UPI साठी लिंक केलेला अकाऊंट ब्लॉक होईल आणि अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
आपला फोन सुरू असतानाच आपल्याला एक मेसेज आलेला असतो. आपण लिंकवर क्लिक करतो. तिथे लिहिलेलं असतं, अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी एक रुपयाचं transaction करा.
आपण एक रुपया एंटर करतो. बटणावर क्लिक केल्यावर आपल्याला UPI चे पर्याय दिसतात. आपल्याला हवा असलेला पर्याय आपण निवडतो.
पैसे जाण्याच्या वेळी आपला टी.पिन विचारला जातो. आपण टी.पिन टाकतो आणि एक रुपया आपल्या खात्यातून वळता होतो…
आपल्याला एक मेसेज येतो ज्यात असं म्हटलेलं असतं की तुमचा अकाऊंट व्हेरिफाय झाला आहे आणि तुम्ही इतर व्यवहार करू शकता.
 
काही मिनिटांच्या अंतरातच आपलं खातं ज्या बँकेत आहे तिथून आपल्याला मेसेज येतो की खात्यातून भली मोठी रक्कम UPI द्वारे वजा झाली आहे. या वेळी आपण गोंधळतो.
 
मेसेजमध्ये आलेली लिंक आपण पुन्हा क्लिक केल्यास ती उघडत नाही आणि आलेल्या फोनवर परत कॉल केल्यास तो नंबर आता अस्तित्वात नाही असा संदेश ऐकू येतो.
 
जर फोन उचलला गेलाच तर समोरची व्यक्ती सांगते की हा तांत्रिक बिघाड आहे. पैसे परत मिळवण्यासाठी आलेल्या लिंकवर क्लिक करून रिफंडचं बटण दाबा.
 

आपण तसं करतो पण पैसे येण्याऐवजी पुन्हा खात्यातून वळते होतात, या वेळी टी.पिन न टाकता…




दुसरा प्रकार आहे रिवॉर्ड मेसेजचा:

आपल्याला एक मेसेज येतो ज्यात म्हटलेलं असतं अभिनंदन अमूक अमूक रक्कम आपण जिंकला आहात. रक्कम मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
रिवॉर्डच्या लालसेपोटी आपण क्लिक करत पुढे जातो आणि आपल्या खात्यातून पैसे वळते होतात. यातलाच अजून प्रकार म्हणजे खात्यात एक रुपया क्रेडिट होतो. आपल्याला फोन येतो.
समोरची व्यक्ती स्वत:च सांगते की आपलं खातं त्यांच्या हाती लागलं असून थोड्याच वेळात UPIद्वारे सगळी रक्कम काढून घेण्यात येईल. जर खातं सुरक्षित करायचं असेल तर आलेल्या लिंकवर क्लिक करा.
पुन्हा तसंच. लिंक येते, आपण त्यावर क्लिक करत पुढे जातो आणि काही क्षणातच सगळी रक्कम चोरट्यांपर्यंत पोहोचते…
अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या बँकेच्या ग्राहकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मी वरील मुद्दे मांडले आहेत. बँकेच्या ब्रांचवर व्यवस्थित पाळत ठेवणारी व्यक्ती असं करू शकेल.
 

आमच्याकडे ज्या तक्रारी आत्तापर्यंत आल्या आहेत, त्या बँक हॉलिडेच्या आदल्या संध्याकाळच्या किंवा बँक हॉलिडेच्या दिवशी झालेल्या गैरव्यवहारांबाबत असतात.


वृद्ध किंवा UPI ची कमी जाण असलेल्या व्यक्ती अशा चोरट्यांच्या निशाण्यावर असतात…


या चोरांचं मुख्य शस्त्र असतं panic situation. अशी वेळ निर्माण करायची की व्यक्ती तिची सारासार विचार करण्याची क्षमताच हरवते.
आलेल्या लिंकसुद्धा सहसा पाच-दहा मिनिटांच्याच असतात जेणेकरून दुसरा काही पर्याय किंवा कोणाला विचारता येईल ही आशाच उरत नाही.
या चोरीमधला कच्चा दुवा असतो ग्राहकाचा टी.पिन व ओ.टी.पी. तो मिळवल्याशिवाय चोरांना काहीच करता येत नाही. या दोन्हीही गोष्टी ग्राहकाच्या हातात असतात.
जर टी.पिन. किंवा ओ.टी.पी. दिला गेला नाही तर कदाचित आपले पैसे वाचू शकतात. जर पैसे गेलेच, तर ताबडतोब सायबर सेलमध्ये तक्रार करावी.
बँकेकडे एक dispute form असतो. तो duplicate मध्ये भरून एक प्रत सायबर सेलला व दुसरी बँकेकडे द्यावी…
पैसे परत येतीलच हे नाही सांगता येत. पण तक्रार आणि क्लेम कार्यप्रणाली सुरू होते. गेल्या महिन्याभरात आमच्याकडे दोन UPI transaction fraud केसेस आल्या ज्यातल्या एका व्यक्तीचे पैसे परतही मिळाले पण दुसरीचे गेले ते अजून गेलेच आहेत.
तेव्हा मंडळी सावधान. अनोळखी लिंकवर क्लिक करत असाल तर आधी नीट विचार करा. जर तुमच्या खात्यात आपोआप एक रुपया आला असेल तर आधी तुमच्या गुंतवणूकी पडताळून पहा.
विमा कंपन्या किंवा mutual fund कंपन्या account verification साठी असं करतात पण तो रुपया परत नाही मागत.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोवर तुमची खात्री पटत नाही तोवर तुमचा ओ.टी.पी. किंवा टी.पिन. कोणालाही देऊ नका किंवा कुठल्याही अनोळखी साईटवर टाकू नका…

तुमचा पैसा तुमचीच काळजी…



©अनिकेत परशुराम आपटे,

एस.व्ही.सी. बँक मुंबई.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button
improve alexa rank