“निंदक” आणि “शत्रू” यातील फरक

“निंदक” आणि “शत्रू” यातील फरक
©सौ.वैष्णवी व कळसे
“निंदक” म्हणजे ते लोक जे आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल चर्चा करण्यात जास्त रुची ठेवतात…अशा लोकांना दुसऱ्यांची प्रगती बघवत नाही, मुळात दुसरे त्यांच्या पेक्षा चांगलं जीवन जगत आहेत हाच विचार आणि त्यांचं असमाधानी मन त्यांना असं बनवतं…
त्यांना सतत आपल्यात कमी, चुका, दिसतात, ही लोक आपल्या अशा पण चुका काढतील ज्या आपण कधी केल्या सुद्धा नाहीत… दृष्टिकोन थोडासा बदलवून बघितला तर लक्षात येईल, हे लोक आपल्याला आणखी better बनवतात….
आपल्यावर जिथे जिथे ते बोटं उचलतील, तिथे तिथे त्यांना चुकीचं prove करण्यासाठी का असेना, आपण ती चूक सुधारतो…… जी गोष्ट आपल्याला जमत नाही, ती त्यांना खोटं ठरावण्यासाठी का असेना, आपण शिकतो….
“उस वक्त हम हमारी कमजोरी अपनी ताकत बनाते है”
आपण सर्वांनी हा दोहा ऐकला असेलच “निंदक नियरे राखिये, आंगण कुटी छवाय”… बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय..”
याचा अर्थ असा होतो की निंदक आपल्याला आजूबाजूला असलेच पाहिजे,ते आपल्यातील चुकीच्या गोष्टी, आपल्यातील दोष कुठल्याही साबण आणि पाण्या शिवाय धुवून काढतात, व आपलं मन स्वच्छ करतात….. आणि आपल्याला successful बनवण्यात नकळत मदत करतात…
“जेवढे उपयोगी निंदक तेवढेच घातक मित्रांमध्ये लपलेले शत्रू.. “
या दोन “personality” मध्ये खूप मोठा फरक आहे…
मित्रा मध्ये लपलेल्या शत्रूच एकच काम… “दुसऱ्यांच्या प्रगतीचे प्रयत्न कसे करायचे नाकाम?”
“मित्रामधला शत्रू” हा एक विचित्र प्राणी आहे, जो ओळखणे कठीण असून, त्याला शोधून काढणं अतिशय गरजेचं आहे…. अगदी लहान पणापासून हा स्वार्थी प्राणी बघायला मिळतो…
लहानपणी शाळेतुन घरी आल्यावर हा पटकन त्याचं homework करून घेतो.
आणि लगेच निघतो बाकी मित्रांना घेऊन खेळायला….. आता या भोळ्या मुलांना वाटतं की हा पण आपल्यासारखाच….!
मग जातात आपले सर्व अभ्यास सोडून खेळायला…. दुसऱ्या दिवशी या भोळ्या मुलांना मिळतो मार आणि याला मात्र शाबासकी..! भारीच ना?
ही मानसिकता लहानपणापासूनच असते कमकुवत मुलांमध्ये जी त्यांच्या वयासोबत मोठी होते….
जी घाणेरडी कामं लहान असताना केली, ती आता मोठे झाल्यावर सुद्धा सुरूच असते….
उदाहरणं जरी बदललीत, माणसं जरीही बदलली असली, तरीही उद्देश आजही तोच आपल्या पुढे कोणाला जाऊ न देण्याचा….
“3 idiots” movie मध्ये पण असं एक उदाहरण बघायला मिळालं होतं चतुर चं…
त्याला स्वतःला मार्क जास्त मिळवण्यापेक्षा दुसऱ्याचे कसे कमी करता येतील यासाठी त्याने केलेले काम…
स्वतः जास्त मेहनत करण्यापेक्षा दुसऱ्यांना प्रयत्न करण्यास अडवणे सोपं वाटलं त्याला…
अगदी असे चतुर सारखे मित्र आपल्याला आजूबाजूला असतात….. आपण ते ओळखायला हवेत….
अशा लोकांमध्ये राहणं टाळता जरीही नाही आलं तरीही कमीतकमी त्याच्या शब्दांचा आपल्या डोक्यावर आणि मनावर काडीमात्र परिणाम होणार नाही एवढं स्वतःला खांबीर बनवलं पाहिजे….
अशा लोकांनी सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेऊन स्वतःसाठी खड्डा खोदण्यापेक्षा अशा लोकांकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे.
त्यांच्या मनोरंजनासाठी स्वतःचा बळी जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे…
माझ्या डोळ्यांसमोर असे बरेच उदाहरणं आहेत, जी बोलून दाखविले तर नाराज होतील काही लोकं
नेहमी प्रमाणे आजही म्हणते, लिहिण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी…