My title My title My title My title
Brain StormingHealth

मेडिक्लेम म्हणजे नक्की काय…?

मेडिक्लेम म्हणजे नक्की काय…?

©श्रीपाद बावीकर 

मेडिकल इमर्जन्सी अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघाता मुळे आपणास २४ तासा किंवा पेक्षा अधिक कालावधी साठी किंवा २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी आपणास ऍडमिट होण्याची गरज पडते.

इन्शुरन्स कंपनी कडून घेतलेल्या पॉलिसी च्या दावा / क्लेम नोंदणी करून ऍडमिट व्होव लागत…

एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग बिले व इतर कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून आपण केलेला खर्च परत मिळवता येतो.

मेडिक्लेम असेल तर पुढील खर्च मिळतात 😗

खोलीभाडे, नर्सिंग चार्जेस, डॉक्टर तपासणी चार्जेस, डॉक्टर फेरी चार्जेस, आय सी यु चार्जेस, एन आय सी यु चार्जेस, गोळ्या, औषधे, ड्रगस, सलाइन, सोनोग्राफी, एम आर आय, सिटी स्कॅन, रक्त लघवी तपासणी, रक्त पिशवी, विशेष लॅबोरेटरी तपासण्या, रुग्णवाहिका, ओपरेशन थेटर चे भाडे, डॉक्टर सर्जरी खर्च तसेच काही कंपन्या दिवसाचा पगार देखील काही अंशी परत देतात तसेच असे व आणखी इतर खर्च मिळतात.



मेडिक्लेम काढणे गरजे चे का आहे हे पाहूयात:

अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.बँकेत अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.

बँकेतली एफ डी मोडावी लागते.सोन्याचे नाणे गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हात पसरावे लागतात.

बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना अथवा गहाण ठेवतानं लोक दिसतात.वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने अनेक व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.



मेडिक्लेम असल्यास होणारे प्रमुख फायदे 😗

आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल चे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.

हॉस्पिटल मध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही.

बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर, गाडी, जमीन, प्लॉट, फ्लँट, दुकान, विकण्याची वेळ येत नाही.

चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.

नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपासरण्याची वेळ येत नाही.

भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.

मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.

कुठलाहि इन्शुरन्स नसला तरी चालतो पण मेडिक्लेम हा प्रथम काढावयाची बाब आहे.

ह्या सर्व गोष्टींतून मुक्त होण्यासाठी तुम्ही नक्की मेडिक्लेम काढून घ्या…



पॉलिसी काढताना पुढील गोष्टी लक्षात घ्या…

कुठलीही पॉलिसी घेताना विम्याची रक्कम महत्वाची आहे. आजच्या काळात मेडिकल खर्च खूप वाढला आहे त्यामुळे पॉलिसी घेताना विम्याची रक्कम पुरेशी असेल हे पहावे.

जर आपण कौटुंबिक विमा घेत असाल तर विम्याची रक्कम अजून वाढवणे उत्तम.

वैद्यकीय विमा घेताना को-पे (co-pay) अत्यंत महत्वाचा असतो. co-pay म्हणजे claim केला असता विमा धारकाने भरण्याची रक्कम.

ही रक्कम भरल्यानंतरच विमा कंपनी तिचा हिस्सा भरते.

जर claim ची रक्कम co-pay पेक्षा कमी असेल तर पूर्ण रक्कम विमा धारकाला भरावी लागते.

Pre-existing (पॉलिसी घेण्यापुर्वीचे) आजार पॉलिसीच्या सुरवातीच्या 1 ते 4 वर्ष cover होत नाहीत. जरी असे असले तरी पॉलिसी घेताना त्याची माहिती फोर्ममध्ये भरावी हे उत्तम.

Claim Settlement Ratio – IRDA च्या वेबसाईट वर जाऊन विमा कंपन्याचे Claim Settlement Ratio बघून घ्यावे. आजकाल IRDA चे लक्ष वाढल्यामुळे च्या बहुतेक कंपन्या Claim देऊ लागल्या आहेत.

शक्यतो फक्त हेल्थ इन्शुरन्स हा विमा कंपनी अथवा बँकेतून किंवा ऑनलाईन तसेच रजिस्टर्ड विमा प्रतिनिधी कडूनच घ्यावा…

ज्यांची परिस्थिती फार उत्तम नाही अश्या लोकांनी वयक्तिक अथवा कुटुंबातील सगळ्यांनाच विमा काढणे शक्य नसल्यास किमान कर्त्या व्यक्तीचा तरी वार्षिक 3000 रु चे जनरल इन्शुरन्स काढला तरी चालतो त्या मध्ये ही वर्ष्यातून 6000 पर डे प्रमाणे 1,80,000/- च कव्हर मिळत.

माहिती आवडल्यास Like आणि Share करा.

अजुन काही माहिती हवी असल्यास कृपया सकाळी 9:00 ते 6:00 च्या दरम्यान कॉल करावा अथवा मेसेज करा.

©श्रीपाद बावीकर (81490 20220)

Photo Credit : Google Images

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!
Back to top button
improve alexa rank