Itworkss

How to Quit drinking

October 30, 2021 | by Varunraj kalse

How to Quit Drinking

दारुड्याला न सांगता त्याची दारू सोडवा



©तुषार नातू, निर्धार व्यसनमुक्ती केंद्र



डायसल्फरम किवा अँटीअब्युज उपचार !

वर्तमान पत्रात नेहमी आपण ” दारुड्याला न सांगता दारू सोडवा ” अशा जाहिराती वाचतो…

बहुधा सगळेच व्यसनी सहजा सहजी दारू सोडण्यास तयार होत नाहीत… या साठी त्याचे कुटुंबीय नेहमी अशा एखाद्या औषधाच्या शोधात असतात…

की जे घेतल्याने व्यसनी व्यक्तीला दारूचा कायमचा तिटकारा येईल अथवा त्याचे व्यसन कायमचे सुटेल…

शिवाय तो स्वतःहून कोणते औषध घ्यायला तयार होत नाही म्हणून ते त्याला गुपचूप देता येईल अशा औषधाच्या शोधात असतातच नेहमी .

अशी जाहिरात देणारे लोक तुम्हाला गोळ्या किवा गोळ्यांची पावडर पुड्या बनवून देतात. 

हे औषध जर दारुड्याला त्याच्या नकळत जेवणात अथवा इतर खाद्य पदार्थात मिसळून दिले तर त्याची दारू सुटेल…

त्याच्या मनात दारूचा तिरस्कार निर्माण होईल असे सांगतात…

कुटुंबियांसाठी हे खूपच छान सोय असते…

मात्र ते औषध नेमके काय आहे… त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे त्यांना सांगितले जात नाहीत… म्हणून त्यावर प्रकाश झोत टाकण्याचा हा प्रयत्न आहे .

डायसल्फारम नावाच्या केमिकल पासून त्या गोळ्या तयार केल्या असतात किवा अशा गोळ्यांची ती पावडर असते…

या केमिकल चे वैशिष्ट्य असे की याचा अल्कोहोलशी छत्तीसचा आकडा आहे…

म्हणजे हे केमिकल पोटात गेल्यावर २४ तास त्याचा परिणाम असतो…

त्या काळात कोणी दारू प्यायले तर त्याला प्रचंड त्रास होतो…उलट्या, जुलाब, जीव घाबर होणे, पोटात दुखणे, रक्तदाब वाढून घामाघूम होणे वगैरे लक्षणे उद्भवतात…

हे औषध त्या दारुड्याच्या नकळत त्याच्या जेवणातून त्याला दिले गेले असल्याने त्या लक्षणांना घाबरून दारुड्याला असे वाटते की आपल्याला हे सारे त्रास दारूमुळे होत आहेत…

व दारूची भीती वाटून तो दारू सोडतो अशी या मागील कल्पना आहे…

आता त्या मागील प्रमुख धोका असा आहे की….

१ )

जर त्या दारुड्याची तब्येत आधीच दारूमुळे खूप खराब झालेली असेल म्हणजे त्याला दारूमुळे काही अंतर्गत आजार ज्याची त्याला माहिती नाही किवा तपासणी झालेली नाही…

अशा व्यक्तीने जर या औषधावर दारू प्यायली तर त्याला होणाऱ्या प्रचंड त्रासाने त्या व्यसनीच्या जीवाला धोका उदभवू शकतो…

किवा ज्या दारूड्यांना रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, अपस्मार, फेफरे येणे, डोक्याला पूर्वी काही मार लागला असेल…

त्यांनी जर या गोळ्यांचे नकळत सेवन करून त्यावर दारू प्यायली तर ‘ लेने के देने ‘ पडतात. अशा वेळी जर ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध झाली नाही तर ते त्याच्या जीवावर बेतते.

पूर्वी नांदेड जिल्ह्यात अश्या औषधाच्या सेवनानंतर दारू प्यायल्याने तीन लोकांचा मृत्यू झाल्याने त्या गोळ्या देणाऱ्या बाबाला अटक झालेली आहे .

२ )

एखादा हट्टी किवा जिद्दी दारुडा जर असा त्रास होऊन देखील दारू पीत राहिला तर त्या डायसल्फरम या केमिकलची दारूशी लढण्याची शक्ती कमी होत जाते…

व पहिल्या वेळी चार उलट्या झाल्या असतील तर दुसर्या वेळी दोन उलट्या होतात…

तिसर्या वेळी एकच उलटी होते आणि नंतर त्या गोळ्यांचा उपयोग नष्ट होऊन दारू आणि गोळ्या सुखनैव दारुड्याच्या पोटात नांदतात .

३ )

दारुड्याने जरी या त्रासाने दारू काही काळ बंद केली तरी दारूचे आकर्षण त्याच्या डोक्यात असतेच…

त्याच्या दारुड्या मित्रांपैकी एखादा अनुभवी मित्र नेमके काय झालेय ते ओळखून त्याला सल्ला देतो की तुला घरची मंडळी जेवणातून काहीतरी औषध देत आहेत…

तू घरी जेवण किवा काही खाणे पिणे बंद करून…

मग दारू पिऊन पहा तुला अजिबात त्रास होणार नाही…

दारुडा तसे करतो आणि त्याला घरी जेवण केले नसल्याने पोटात त्या गोळ्यांचा अंश नसतो व त्याला काही त्रास होत नाही…

तो समजतो की आपल्याला जेवणातून घरची मंडळी औषध देत आहेत… यावर तो रागावून घरी मोठे भांडण करतो .

४ )

हुषार दारुड्यांनी यावर देखील उपाय शोधला आहे…

हे केमिकल पोटात असताना जर जास्त आंबट खाल्ले तर त्या केमिकलचा परिणाम कमी होऊन व्यक्ती दारू पिण्यास लायक बनतो . त्यामुळे अशी औषधे बहुधा फायदेशीर ठरत नाहीत…

बहुतेक व्यसनमुक्ती केंद्रात म्हणूनच अशा गोळ्या वापरात नाहीत…

त्या एवंजी व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्तीच्या व्यसनी होण्यामागील विचार…

मानसिकता जाणून घेवून ती मानसिकत बदलण्यास त्याला मदत केली जाते व्यसनमुक्ती केंद्रात ‘ मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ‘.

हे धोरण राबवून दारूला नकार देण्याची शक्ती व्यसनी व्यक्तीमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न होतात .



©तुषार नातू, निर्धार व्यसनमुक्ती केंद्र,

डाॅ. जी. डी .पोळ फाऊंडेशन , येरळा आयुर्वेदिक हाॅस्पिटल, ४ था मजला, खारघर, सेक्टर ४, नवी मुंबई ..

संपर्क – 07020752695 , 9324592248



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

RELATED POSTS

View all

view all