Itworkss

Elon Musk Demanding Edit Feature from One Year…

April 6, 2022 | by Varunraj kalse

 

सध्या ट्विटर (Twitter) आणि Elon Musk असे दोन विषय चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे टेस्लाचे (Tesla) सीईओ Elon Musk यांनी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ट्विटरचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 9.2 टक्के शेअर खरेदी केल्यानंतर Elon Musk यांची ट्विटरच्या संचालक मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ट्विटरमधील मोठ्या गुंतवणुकीनंतर लगेचच Elon Musk यांनी सूत्र हलवण्यास सुरुवात केल्याचं बोललं जातं आहे. मस्क यांनी मंगळवारी ट्विटर पोल घेत युजर्सा एडिट बटण हवंय का याबाबत विचारणा केली होती. या पोलला युजर्स चांगला प्रतिसादही देत आहेत.

दरम्यान, आता या Elon Musk यांच्या ट्विटर पोलनंतर एडिट बटणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरने मस्क यांच्या पोलबाबत मजेशीर ट्विट केलं आहे. ट्विटरनं म्हटलंय की, आम्ही पोल घेण्याच्या आधीपासूनच एडिट बटणावर काम करतोय. ट्विटरने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘आता सगळेच विचारत आहेत म्हणून सांगतो. होय, आम्ही गेल्या वर्षीपासून एडिट बटणाच्या पर्यायावर काम करत आहोत. मात्र, ही कल्पना आम्हांला ट्विटर पोलमधून आलेली नाही. आम्ही आता लवकरच यांची चाचणी सुरू करणार आहोत. यामध्ये फिचर कसे काम करते, काय शक्य आहे, काय सुधारणा करण्यात येतील हे पुढील काही महिन्यांत कळेल.’

Elon Musk यांनी मंगळवारी सकाळी आपल्या ट्वीटर हँडलवरुन ट्वीटमध्ये एडिट पर्याय हवा की नको, असा प्रश्न विचारुन युजर्सची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. Elon Musk यांच्या या पोलला उत्तर देताना ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी युजर्सला सल्ला दिला होता की, Elon Musk यांनी विचारलेला प्रश्न खूप महत्वाचा आहे, आपलं उत्तर काळजीपूर्वक निवडा. त्यांच्या या ट्वीटलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ट्विटरने पोल आणि एडिट पर्यायाबाबत मजेशीर ट्वीट केलं आहे.

 

RELATED POSTS

View all

view all