My title My title My title My title
Brain StormingMental Health

Be a Good Boss – चांगले बॉस बना…!

Be a Good Boss – चांगले बॉस बना…!



©सलिल सुधाकर चौधरी



तुम्ही उद्योजक असाल किंवा मोठे पदाधिकारी, तुम्हाला तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची व सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली तर तुमच्या उद्योगाची वा कार्यालयाची झपाट्याने प्रगती होईल.


परंतु, हे ठाऊक असूनही, बरेचदा आपण कमी पडतो ते कर्मचाऱ्यांची मनं जाणण्यात व त्यामुळेच आपल्या हाताखाली कर्मचारी फारसे टिकत नाहीत.


इंग्रजीत एक म्हण आहे, ‘People Don’t leave jobs, they leave bad bosses’ अर्थात्, एकवेळ कमी पगारावरही कर्मचारी काम करतील.


पण खडूस Boss बॉसच्या हाताखाली काम करताना त्या कर्मचाऱ्यांची होणारी मानसिक घुसमट सहन करण्याच्या पलीकडे असते आणि अखेरीस कर्मचारी अशा नोकरीला अल्पावधीतच रामराम ठोकतात.


जे आजवर उत्तम Boss बॉस म्हणून लोकप्रिय झाले त्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती होती आणि म्हणूनच ते वेळोवेळी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन शब्द कौतुकाचे दिल्यावाचून रहात नसत.


एका अभ्यासांती असा निष्कर्ष निघाला की, तुम्ही जर बॉस असाल तर हे लक्षात ठेवा, की तुम्ही जितक्या वेळा तुमच्या कर्मचाऱ्यांवर डाफरता त्याच्या तिप्पट वेळा तुम्ही त्यांचं कौतुक करायला हवं तेव्हाच ते तुमच्यासोबत काम करताना खूश रहातील.


यामुळे तुमच्या संपूर्ण कर्मचारी वर्गात नेहमीच आनंदाचे वातावरण राहील यात शंका नाही.


कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कौतुकाच्या शब्दाबरोबरच मध्येमध्ये त्यांना बक्षीस व प्रोत्साहनपर भेटवस्तू वा अन्य काहीतरी द्यायलाच हवं.


अगदी ढेपाळलेल्या कर्मचाऱ्यासाठीही या सर्व बाबी फार प्रेरणादायक ठरतात व तो कर्मचारी लवकरच झटून कामाला लागतो.


याप्रकारे करा कर्मचाऱ्यांचं कौतुक – 
• कर्मचाऱ्यांना रागवायचं ओरडायचं असेल तर ते खाजगीत परंतु कौतुक करताना मात्र आवर्जून चारचौघात करा.


• कौतुक करताना पाल्हाळ लावण्याची गरज नाही. अगदी मोजक्या शब्दात आणि टू द पॉईंट बोलून कर्मचाऱ्यांचं कौतुक करा.


• कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामाबद्दल कधीमधी त्यांचे आभार माना.


• मीटींगमध्ये त्यांच्या कामाची आवर्जून दखल घ्या.


• अध्येमध्ये त्यांच्यासह स्नेहभोजन वा चहापार्टी आयोजित करा.


• त्यांच्या कामासाठी गरजेची अशी वस्तू तुमच्यातर्फे त्यांना भेट म्हणून द्या.


• शब्दांपेक्षा कृती अधिक बोलते हे जाणून कधीतरी त्यांच्या पाठीवर कौतुकाने थाप द्या.

थँक यू, ग्रेट जॉब, वेल डन वगैरे म्हणताना हस्तांदोलन करायला आवर्जून पुढे व्हा.


• जबाबदारीचं काम द्या. तुम्ही विश्वास ठेवलात तर त्यांचा स्वतःवरचा विश्वास आपोआप वाढतो.


• चांगले बॉस म्हणजे केवळ गोड बोलणारे बॉस नव्हे.

तर जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण तयार करते तीच व्यक्ती चांगली बॉस होऊ शकते.


जगप्रसिद्ध सॉफ्टस्किल्स ट्रेनर डेल कार्नेगी म्हणतात, ‘लोक पैशासाठी काम करतात हे जरी खरं असलं तरीही त्यांना त्याहीपेक्षा अधिक हवं असतं ते म्हणजे कौतुक, ओळख आणि बक्षीस …’




©सलिल सुधाकर चौधरी

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button
improve alexa rank