Itworkss

Awesome Startup – Rubabdar The Wedding House and Designer Studio

June 18, 2022 | by Varunraj kalse

Rubabdar The Wedding House and Designer Studio…



©Ravi Nimbalkar



नावाप्रमाणेच सगळं काही रूबाबदार…



Mahesh आणि Mayur Buchude

या भावंडांनी चाकण या ठिकाणी हे जे काही उभं केलं आहे ते अफाटच आहे.

अहो! पंचविशीतील ही पोरं!


ज्यांनी लग्नासाठी नवरा नवरींना कोणता पोशाख असला पाहिजे?

तो कसा असला पाहिजे?

त्याचा रंग कोणता?

कपडा कोणता ?


या पासून वेगळ्या पद्धतीचे फेटे, कट्यार, मोत्याच्या माळा, मोजडी, कोल्हापूरी चप्पल किती किती तरी साहित्य यांच्याकडे उपलब्ध आहे.

गेल्या आठवड्यात खास या भावंडांकडे गेलो होतो.

तेव्हा महेशने जे दाखवले ते अफाट अन् अफलातूनच होते.

जवळपास ५० कामगार काम करतात.

८-१० कामगार तर खास

शेरवानी,

जोधपूरी शिवणे,

कपड्यांवर कशिदा काढणे यासाठी होते.

या लोकांचा कपड्यांवर चालणारा हात अन् त्यातून निर्माण होणार नक्षीकाम तर बघत राहाव असाच होत.

एका मोठ्या हाॅल मध्ये किती तरी शिलाई मशीन एका सूरात काम करत होत्या.

कोण कपडा फाडत होता,

कोणी शिवत होता,

आणि कोण हुक लावत होता

तर कोण गुंड्या लावण्याच काम करत होता.

महेश ला विचारले, “अरे हे काय आहे? एवढ्या सगळ्या एकाच रंगाच्या पॅन्ट्स का शिवत आहेत?

तर तो म्हणाला, “सर! एक नामांकित कंपनीची ऑर्डर आहे आणि त्यांना काही हजारांत वेगवेगळ्या साईझ मध्ये ह्या पॅन्ट शिवून द्यायच्या आहेत.”

त्याच वेळी त्याला विचारलं ‘तुझं वय किती आहे?’
तो बोलला,’ २४ वर्षे “

आश्चर्य वाटलं!

चाकण पासून ८-१० किलोमीटर वर तळेगावची ही पोरं, घरात पुर्वी कोणीही या व्यवसायात नाही.

व्यवसाय सुरू करताना लोकं म्हणायची,

‘आपल्याला होत असतय काय?’

‘टेलरिंगच काम करणार काय?’

असे टोमणे मारत होते.

तेव्हा महेश – मयूर च्या आई-वडिलांनी या पोरावरती विश्वास ठेवला अन् त्यांना ५-६ वर्षांपूर्वी भांडवल दिलं.

आज या पोरांनी आई-वडिलांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता काहीतरी भव्यदिव्य उभा केलं.

शेकडो किलोमीटर वरून लोकं रूबाबदार मध्ये खास कपडे शिवून घ्यायला येतात.

यावेळी महेश, प्रत्येकाला न थकता, अतिशय नम्रपणे वेळ देतो.

मी, Santosh अन् Amol ने तर जवळपास चार-साडेचार तास महेशला त्रास दिला😀

एखाद्या व्यवसायातील समर्पण, नम्रता आणि गुणवत्ता अनुभवांची असेल तर एक वेळ अवश्य #रूबाबदार ला भेट दिली पाहिजे.
एकदा गेलात की तुम्ही वारंवार जाणार ही खात्री आहे.

महेश – मयूर,
खूप खूप मोठे व्हा रे!😍

अन् असेच जमिनीवर रहा!



रूबाबदार काय आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

https://instagram.com/rubabdar_wedding_studio_?igshid=YmMyMTA2M2Y=



Awesome Startup – Rubabdar The Wedding House and Designer Studio



Keywords:

Awesome Startup

Wedding House

Designer Studio



 

 

RELATED POSTS

View all

view all