My title My title
Something Different

Ancient Temple Part 2 in Marathi

Ancient Temple

प्राचीन मंदिर



©Anna ®2022
7249157379



प्राचीन मंदिराची रचना करताना मंदिराबाहेरील भिंतीवर देवी- देवतांची विविध रूपातील शिल्प कोरलेली दिसून येतात मात्र त्यामध्ये प्रामुख्याने अतिशय सुंदर दिसणार्‍या अप्सरा देवींची शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात.

प्राचीन शिल्पशास्त्रामध्ये मुख्य सोळा ते बत्तीस अप्सरांचा उल्लेख दिसून येतो.

ह्या शिल्पांवरील हावभाव, नक्षीकाम, सौंदर्य पाहताना अर्थातच आपले मन मोहून जाते. मात्र प्राचीन शिल्पकारांनी ह्या मुर्तींमधून भक्तांना गुढार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मंदिरामध्ये जाताना भक्तांची मन:स्थिती कशी असायला हवी हे सांगण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष मुर्तीमधून प्राचीन शिल्पकारांनी केलेला दिसून येतो.

प्राचीन शिल्पशास्त्रानुसार मंदिराबाहेर भिंतीवर कोरलेल्या अप्सरा देवींचे सविस्तर वर्णन अशाप्रकारे आहे-

१) पुत्रवल्लभा- हि मुर्ती एका लहान बाळाला कडेवर घेतलेली दिसून येते. देव आणि भक्त यांच्यातील वात्सल्याचे नाते ह्या मुर्तीतून दिसून येते.

२) विन्यासा- ह्या मुर्तीमध्ये विरक्ती दाखवलेली आहे. ह्या मुर्तीतून प्राचीन शिल्पकाराला सांगायचे आहे की, भक्ताने भोगापासून दूर गेल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही.

३) शुभगामिनी- शुभगामिनी अप्सरा पायात रूतलेला काटा काढण्याचा प्रयत्न करत आहे असे ह्या मुर्तीतून दिसून येते. ह्यातून असे सुचित होते की, मंदिरामध्ये जाताना मनात रूतलेला कामक्रोधादी विकार भक्ताने काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

४) शत्रुमर्दिनी- ह्या मुर्तीच्या डाव्या हातामध्ये तुटलेले मुंडके आणि उजव्या हातामध्ये तलवार असते. ह्याचा अर्थ असा आहे की, भक्ताने मनामध्ये विकार नामक शत्रु समजून त्याला मंदिरात जाण्याआधी छाटून टाकायला हवे.

५) मदन- रति- काही मंदिरांच्या भिंतीवर मदन- रति शिल्पे कोरलेली दिसतात परंतु हि दोन्ही शिल्ले एकत्रित नसून वेगवेगळी दिसून येतात. ह्याचाच अर्थ असा आहे की, भक्ताने मंदिरामध्ये जाताना काम-वासना ह्या विकारापासून दूर होवून मंदिरात प्रवेश करायचा आहे.

तसेच अन्य अप्सरा शिल्पांमध्ये प्रामुख्याने अप्सरा व लहान माकड एकत्र कोरलेले दिसतात. ह्या शिल्पातून भक्ताची अस्थिर मनाची चंचलता माकडाच्या रूपातून दर्शवली आहे.

तसेच काही शिल्पामध्ये अप्सरा आणि विंचू एकत्र कोरलेले दिसून येतात (ह्या शिल्पामध्ये अप्सरेच्या उजव्या मांडीवर चढत असलेला विंचू दाखवलेला असतो.

परंतु त्या विंचवाला घाबरून वस्त्राला झटका देत असणारी अप्सरा शिल्प कोरलेले दिसते) ह्यातून प्राचीन शिल्पकाराला सांगायचे आहे की, कामक्रोधादी विकार भक्ताला विंचवाच्या विषासारखे चढत जात असतात परंतु भक्ताने त्या विंचूरूपी कामक्रोधाला झटकून द्यायचे असतात.

अशा अनेक अप्सरा शिल्पामधून प्राचीन शिल्पकारांनी आपली संस्कृती तसेच उद्बोधक संकेत सांगण्याचे प्रयत्न केलेले आहेत. अशा सुंदर अप्सरा शिल्पांमध्ये शुकसारीका, दर्पणा, नर्तकी, डालमालिका, पत्रलेखिका, मर्दला, जया प्रामुख्याने समावेश होतो.



Mystery Behind the Power of Rudraksha(Opens in a new browser tab)

Science Behind Sculpture of Turtle in Temple(Opens in a new browser tab)

Science of Mantras(Opens in a new browser tab)

The Mysteries of the ancient symbolism(Opens in a new browser tab)

Ancient Temple

प्राचीन मंदिर



©Anna ®2022
7249157379

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through ©Anna ®2022 Mob: 7249157379, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

One Comment

  1. I m a daily reader of this blog
    So beautiful description I like
    Specifically Devotional because I m a Kirtankar it helps us

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button