My title My title My title My title
HealthMental Health

7 प्रकारच्या विश्रांती – 7 Types of Rest

7 प्रकारच्या विश्रांती…

दिवसभर खूप दगदगिचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं , बरोबर ना ?

झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो ?

आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते.

झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही.

आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते.

आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे.

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार असतात. ते आपण सविस्तरपणे पाहुयात.



१. शारीरिक विश्रांती – Physical rest

आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.



२. मानसिक विश्रांती

दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसराभोळे होयला सुरुवात होते.

रात्री दमून थकून आपण झोपायला जातो तेव्हा पण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं तेच सुरू असतं.

रात्री झोपताना देखील आपण आपले विचार बाजूला ठेवून झोपू शकत नाही.

८ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही असे वाटत राहतं. बिछान्यावर पडून राहण्याची इच्छा होते.

हे आपल्या सोबत कशामुळे होत असेल याचा विचार कधी आपण केला आहे का ?

मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. 

आता या त्रासातून स्वतःला कसे सोडवायचे ?

आपली नोकरी किंवा काम सोडून देणं हा मार्ग आपण अवलंबू शकत तर नाही. त्यामुळे आपल्या कामाचे एकूण किती तास आहेत ते पहिले बघा. त्यांचे दोन दोन तासात विभाजन करा.

आता प्रत्येक दोन तासांमध्ये एक 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत याचं नियोजन करा .

आपल्याला सुट्टी घेण्याचीही बऱ्याचदा गरज असते. त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे. 

रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा म्हणजे ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होत अश्या विचारांची नोंद ठेवा. जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू ? यावर आपण अभ्यास करू शकतो.



३. सेन्सरी विश्रांती – Sensory rest

विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे , सेन्सरी विश्रांती दिवसभर सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर यांचा समोर बसून काम करणे,  लाईट्स , आजूबाजूला होणारा आवाज , खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे , यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो.

आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का ?

कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत पण ऑनलाइन मिटींग करून ही आपण या त्रासाला सामोरे जात असतो.

यासाठी काम करत असताना काही वेळ अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल.

आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिकस् माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा.



४. क्रिएटीव्ह विश्रांती – Creative break

क्रिएटीव्ह विश्रांतीचे महत्व सातही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे.

अश्या प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते.

आपण आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होतात आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा.

बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आपल्याला क्रिएटीव्ह विश्रांती मिळत असते.

आता फक्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं म्हणजेच क्रिएटीव्ह विश्रांती नव्हे. तर काम सोडून ज्या गोष्टी , छंद, कला आपल्याला आवडतात ते करणे म्हणजे क्रिएटीव्ह विश्रांतीच .

अश्या गोष्टी जिथे आपण व्यक्त होत आहोत असे वाटते , अश्या गोष्टी , छंद जोपासण्यासाठी वेळ देणं याचा समावेश क्रिएटीव्ह विश्रांतीमध्ये होत असतो.

आपण आपले आठवड्यातील 40 तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो. त्यामुळे आपल्याकडून क्रिएटीव्ह काही होत नसल्याचे पाहायला मिळते.



५. भावनिक विश्रांती – Emotional relaxation

सतत इतरांना काय वाटेल यांच्या चिंतेत असण्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते.

कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते. 

अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो अशा मित्राना भेटा/फोन करा.

तेव्हाच आपल्याला “भावनिक विश्रांती” मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे.  



६. सामाजिक विश्रांती – Social relaxation

भावनिक विश्रांती नंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहुयात.

गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अति वापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे.

आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढविणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती.

ज्यांच्याशी २ मिनिटे बोलल्यानंतर लगेचच उत्साह दुणावतो अशा लोकांसोबत संपर्कात राहा. 



७. अध्यात्मिक विश्रांती – Spiritual rest

या विश्रांती नंतर अध्यात्मिक विश्रांती समजून घेऊया , प्रेम , आपुलकी , स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक व मानसिकतेच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं ही अध्यात्मिक विश्रांती. 

आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोग होईल अशा कामांत स्वतःला गुंतवणे, रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान कराणे तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यासोबत  जोडले जा. 



मित्रहो, लक्षात आलं ना? फक्त झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही.

त्यामुळे आता स्वतः साठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या सुदृढ व्हा!



आवडल्यास Like आणि Share करा.

©लेखक Unknown

सोर्स : whatsapp मेसेज.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!
Back to top button
improve alexa rank